मराठी चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित झी चित्र गौरव २०१९ चा पुरस्कार सोहळा दिमाखदार पद्धतीत पार पडला. यंदा झी गौरव पुरस्कार हे २० व्या वर्षात पदार्पण करतआहेत. मराठी सिनेसृष्टीचा सन्मान करण्यासाठी लाभलेला हा पहिलाच प्रतिष्ठित मंच. हा पुरस्कार सोहळा नेहमीच दिमाखदारपणे आणि भव्यदिव्य असा पार पडतो. गेल्या वीस वर्षात या पुरस्कारसोहळ्याने अनेक कलाकार, तंत्रज्ञ् यांना सन्मानित केले आहे. याहीवर्षी अशाच एका जेष्ठ कलाकाराला जीवन गौरव देऊन सन्मानित करण्यात आले.

मुळातच व्हायोलिन हे वाद्य म्हणजे तरल, हळवे सूर. या वाद्याचा गोडवा आणि हळवेपणा तंतोतंत यांच्या व्यक्तिमत्वात उतरलं असल्याची जाणीव होते आणि हे गाणारं व्हायोलिन म्हणजे प्रभाकर जोगअसं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

नगरमधल्या हरेगाव जिल्ह्यात १६ जणांच्या कुटुंबात आपला जन्म झालेल्या प्रभाकरजींच्या वडिलांना असलेली संगीत नाटकांची विशेष आवड कदाचित त्यांच्यात झिरपली असावी. पं. गजाननबुवांकडेत्यांनी संगीताचा श्रीगणेशा केला आणि नंतर नारायणबुवा मारुलकरांकडे आपले शिक्षण सुरु राहिले. यादरम्यान व्हायोलिन सतत त्यांना खुणावत राहिले. त्या काळात तब्बल २५० रुपयांचे लहानसेव्हायोलिन प्रभाकरजींना मिळाले. तिथून या वाद्यासोबत जी गट्टी जमली ती अगदी आजवर. अनेक अडचणींचा सामना करत त्यांच्या या प्रवासात प्रभाकरजींनी संगीतसाधनेत मात्र खंड पडू दिला नाही.संगीत क्षेत्रात व्हायोलिन म्हणजे जोग हेच समीकरण बनलं. संगीतावर प्रेम करणाऱ्या तमाम रसिकांच्या वतीने प्रभाकर जोग यांना यंदाचा झी चित्र गौरव २०१९चा  जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला. झीचित्र गौरव २०१९ रविवार ३१ मार्च २०१९ रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर प्रसारित होणार आहे.