झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणत्या कुटुंबाला नामांकन मिळेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. मुख्य पुरस्कार सोहळ्या इतकाच रंगतदार आणि देखणा असतो तो हा नामांकनाचा सोहळा. यंदा प्रेक्षकांची लाडकी वाहिनी झी मराठी हिने २० वर्षे पूर्ण केली त्यामुळे या सेलिब्रेशनला एक वेगळीच रंगत होती. एका विशष्ट थीमवर आधारित असलेल्या या सोहळ्याची यावर्षी ‘ग्लॅमरस स्ट्राईप्स’ अशी थिम होती.

झी मराठी अवॉर्ड्स २०१९ ची नॉमिनेशन पार्टी शुक्रवारी मुंबईत पार पडली. या पार्टीला चंदेरी दुनियेतील लखलखते तारे अवतरले होते. संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या लाडक्या कलाकारांनी ग्लॅमरस स्ट्राईप्स या थिम अनुसार तयार होऊन या पार्टीला चार चांद लावले. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन चला हवा येऊ द्या मधील डॉक्टर निलेश साबळे आणि सगळ्यांची लाडकी शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर यांनी केले. यंदा तुझ्यात जीव रंगला, माझ्या नवयाची बायको, भागो मोहन प्यारे, मिसेस मुख्यमंत्री, अल्टी पल्टी, रात्रीस खेळ चाले २, अगंबाई सासूबाई या मालिकांमध्ये टफ फाइट बघायला मिळणार आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट बहीण-भाऊ, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट कुटुंब, सर्वोत्कृष्ट मालिका या आणि अशा अनेक विविध श्रेणीत यावेळी नामांकन जाहीर करण्यात आली.

या नामांकन सोहळ्यात अभिजीत खांडकेकर, अनिता दातेकेळकर, ईशा केसकर, हार्दिक जोशी, अक्षया देवधर, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, भाऊ कदम, धनश्री काडगांवकर, चेतन वडनेरे, शिवानी बावकर, अतुल परचुरे, दीप्ती केतकर, तेजश्री प्रधान यांच्यासह झी मराठी वाहिनीच्या मालिकेतील सर्व कलाकारांची उपस्थिती होती. पार्टीत सर्वच सेलिब्रिटींनी भरपूर धमाल तर केलीच पण आता प्रेक्षकांची सर्वात आवडती मालिका आणि कलाकार कोण आहेत हे लवकर कळेल. प्रेक्षक आपल्या लाडक्या कलाकारांना विजेतेपद मिळवून देण्यासाठी त्यांना वोट करून जिंकवू शकतात.

Zee Marathi Awards 2019 Photos / Pic