मराठी चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते असा प्रतिष्ठित झी चित्र गौरव २०१९चा पुरस्कार सोहळा दिमाखदार पद्धतीत पार पडला. यंदा झी गौरव पुरस्कार हे २० व्या वर्षात पदार्पण करतआहेत. हा पुरस्कार सोहळा नेहमीच दिमाखदारपणे आणि भव्यदिव्य असा पार पडतो. गेल्या वीस वर्षात या पुरस्कार सोहळ्याने अनेक कलाकार, तंत्रज्ञ् यांना सन्मानित केले. मराठी सिनेसृष्टीचा सन्मानकरण्यासाठी लाभलेला हा पहिलाच प्रतिष्ठित मंच. यावर्षी देखील कलाविश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या ‘झी चित्र गौरव पुरस्कार २०१९’ सोहळ्यात सर्व कलाकार आणि तंत्रज्ञांना पुरस्कार प्रदानकरण्यात आला.

यंदा मराठी पाऊल पडते पुढे हा सन्मान महाराष्ट्राचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव याला देण्यात आला. हिरो म्हणजे देखणा चेहरा आणि भारदस्त व्यक्तिमत्त्व असा समज खोडून काढून आपल्यानावावर हाऊसफुलचा बोर्ड झळकवणारा हिरो अर्थात सिद्धार्थकुमार रामचंद्र जाधव. गेली अनेक वर्षे सहजसुंदर अभिनयातून सिद्धार्थने तमाम मराठी प्रेक्षकांना अभिमानाचे अनेक क्षण दिले.  मराठीतहिरोच्या रुबाबाने वावरणारा सिद्धू आता हिंदीत काम करणार अशी जेव्हा चर्चा ऐकू लागली तेव्हा अनेकांनी तर्क लावले की हिंदीत काम करणार म्हणजे एखाद्या दुय्यम भूमिकेतच दिसणार. पण याचर्चेलाही छेद देत हिंदीतल्या हिरोच्या बरोबरीने मैदानात उतरत हिंदी चित्रपट सृष्टीतल्या बड्या बड्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना सिद्धार्थने त्याच्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं.

केवळ मराठीनाही तर हिंदी टेलिव्हिजनचाही सिद्धार्थ महत्त्वाचा चेहरा ठरला. यावर्षी प्रदर्शित झालेल्या सिम्बा या चित्रपटामध्ये रणवीर सिंगसोबत आपला सिद्धू स्क्रिनवर येतो तेव्हा आम्हा मराठी प्रेक्षकांचीअभिमानाने कॉलर टाइट होते. केवळ मराठी कलापरंपरेची पताका सर्वदूर पोहोचवणं नव्हे तर ती टिकवण्यासाठी जातिवंत कलाकारच लागतो आणि म्हणूनच पुढे पडणाऱ्या सिद्धार्थच्या प्रत्येक पावलालासाथ देण्यात आनंद मनात झी चित्र गौरव २०१९ मध्ये सिद्धार्थ जाधवला मराठी पाऊल पडते पुढे या गौरवाने सन्मानित करण्यात आलं. हा सन्मान स्वीकारताना सिद्धार्थची प्रतिक्रिया पाहण्यासाठीबघायला विसरू नका ‘झी चित्र गौरव २०१९’ रविवार ३१ मार्च संध्याकाळी ७ वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.