wold-television-premium-banjo-movie-on-zee-yuva

Wold Television Premium ‘Banjo Movie’ On Zee Yuva Ritesh Deshmukh,Nargis Fakhri

झी युवावर “बँजो “चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर

“नवे पर्व युवा सर्व “ म्हणत तरुणांच्या मनात राज्य करायला आलेली युथफूल वाहिनी झी युवा , सांगीतिक सिनेमा ‘बँजो’चे येत्या रविवारी दिनांक ८ जानेवारीला संध्याकाळी ६ वाजता , वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. Ritesh Deshmukh रितेश देशमुख आणि Nargis Fakhri नर्गीस फाकरी यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘बँजो’ हा राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांचा पहिलाच हिंदी सिनेमा आहे. या सिनेमात महाराष्ट्रातील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या सांगीतिक वाद्याचे – ‘बँजो’चे चित्रण करण्यात आले आहे.सिनेमात मुंबईच्या वंचित समाजात राहणा-या चार बँजोवादकांची गोष्ट पाहायला मिळते, ज्यांना क्रिस्टिनाच्या नावाच्या (नर्गीस फाकरी) अमेरिकेहून आलेल्या संगीतकार मुलीच्या रूपाने एक सुवर्णसंधी मिळते. या संधीत लपलेले आव्हान ‘बँजो’ पेलू शकणार का? हे पाहण्यासाठी चित्रपट पहावाच लागेल.

बालक-पालक’ या सुपरहिट चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेली दिग्दर्शक रवी जाधव आणि अभिनेता रितेश देशमुख ही जोडी पुन्हा या चित्रपटाने एकत्र आली .  सिनेमाच्या संकल्पनेविषयी रवी जाधव म्हणाले ,‘मी नटरंग सिनेमावर काम करत होतो तेव्हापासून म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून बँजोचा विषय माझ्या डोक्यात घोळत होता. मला भारतातील रस्त्यांवरच्या कलाकारांसाठी काहीतरी करायचे होते, कारण त्यांना त्यांची गुणवत्ता सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळत नाही आणि पयार्याने त्यांच्या कलेला आदरही मिळत नाही. आपण जॅझ आणि हिप-हॉपबद्दल सतत बोलतो, पण हे प्रकारही स्ट्रीट आर्टचाच एक भाग आहेत आणि काही महान पॉप स्टार्सही रस्त्यावरूनच शिखरावर पोहोचले आहेत. मला लक्षात आले की, बऱ्याच लोकांना ‘बँजो’वाद्य किंवा बँजो कलाकारांबद्दल काहीही माहिती नाही.

सिनेमात बँड नायकाची भूमिका करणारा रितेश देशमुख म्हणाला,‘बँजो या स्ट्रीट आर्ट प्रकाराला आदर मिळवून देण्याचा हा प्रयत्न आहे. हा सिनेमा रस्त्यावरचे सर्व कलाकार, त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या भावनांचे प्रतिबिंब आहे.’

या सिनेमात तराट (रितेश देशमुख), ग्रीस (धर्मेश येलांडे), पेपर (आदित्य कुमार) आणि वाज्या (राम मेनन) या चार बँजो वादकांची कहाणी पाहायला मिळणार आहे, जे मुंबईच्या निम्न वर्गात राहात असतात आणि अमेरिकेत राहाणाऱ्या क्रिस्टिनाच्या (नर्गीस फाख्री) रुपाने त्यांना त्यांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी मिळते…

zee-yuva-new-logo-on-black-backgrround

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here