आजचा विषय जरा गांभीर्याचा आहे आणि तेवढ्याच कुतूहलाचाही कारण आजचा विषय आहे शरीर विच्छेदनाचा म्हणजेच पोस्ट-मोर्टमचा. पोस्ट-मोर्टम हा शब्द आपण सर्वांनी ऐकला आहे आणि तो केव्हा आणि कोणत्या कारणासाठी केला जातो हेही आपल्याला माहिती आहेच. आज मी तुम्हाला सांगणार आहे कि पोस्ट-मोर्टम हे रात्री का केल्या जात नाही, नेहमी सकाळीच का केल्या जाते… चला तर सुरु करूया.

पोस्ट-मार्टम ही एक शल्य चिकित्सा आहे; जी “माणूस का बरं मेला असावा” याची पडताळणी करण्यासाठी केली जाते. पोस्ट-मार्टम करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीच्या परीजनांनकडून परवानगी घेतली जाते आणि त्या नंतरच शस्त्रक्रियेला आरंभ होतो. पोस्ट-मार्टमबद्द्द्ल एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानवी देह मृत्यूमुखी पडल्यानंतर ६ ते १० तासांतच पोस्ट-मार्टम करणे गरजेचे आहे. पण का?

असं केलं नाही तर मानवी शरीरात आणि अवयवांत नैसर्गिक बदल व्यायला लागतात आणि मग हात-पाय अकडणे, शरीर फुगणे यांसारख्या गोष्टी व्हायला लागतात. आता आणखी एक; मृतदेह जर जास्त वेळ प्रकाशात राहिले ट्यूबलाइटमुळे आणि बाकी कोणत्याही कृत्रिम प्रकाशामुळे शरीराला झालेल्या जखमांचे निशाण हे जांभळ्या रंगाचे दिसायला लागतात. ही गोष्ट फोरेन्सिक विज्ञानाला मान्य नाहीये.

रात्री पोस्ट मोर्टम न करण्याचे एक कारण हेही आहे कि नैसर्गिक आणि कृत्रिम प्रकाशात जखमांचे निशाण वेग-वेगळे दिसतात आणि जर ते ओळखण्यात चूक केली आणि रिपोर्ट दिली तर कोर्ट फॉरेंसिकला चेतावणी आणि दंड दोन्ही देऊ सतो म्हणून पोस्ट मोर्टम हे दिवसाच्या प्रकाशातच केले जाते.

मला वाटते तुम्ही इतकी माहिती वाचली तर तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर आपल्या मित्रांनाही ही माहिती वाटा आणि अश्याच माहिती साठी भेट द्या starmarathi.in ला.