बिग बॉस मराठीच्या घरामध्ये ज्यांची चर्चा विशेष रंगते ते सदस्य म्हणजे वीणा आणि शिव... त्यांच्यामध्ये असलेल्या मैत्रीची चर्चा चांगलीच रंगत आहे… वीणासाठी शिवने म्हंटले बेखयाली हे गाणे… या दोघांमधील मैत्री अजूनच दृढ होत जाते आहे… या दोघांचे एकमेकांशिवाय पान हलत नाही… वीणाला जेंव्हा शिवची गरज असते तेंव्हा तो तिच्यासाठी खंबीरपणे उभा असतो… आज शिवला वीणाकडून कॉमप्लिमेंट मिळाली आहे… वीणा शिवला म्हणाली “तू आज छान दिसतो आहे” त्यावर शिवचे म्हणणे आहे, तू जास्त गोड दिसते आहे एकदम कडक, रापचिक दिसते आहेस… आणि मग वीणाने शिवला सांगितले मी तर गोड आहे तू तर छान आहेस.

वीणाचे म्हणणे आहे काल महेश सर म्हणाले जो विजेता असेल त्याला मी परफ्यूम देणार आणि मला माहिती आहे कोणाला मिळणार… वीणाल वाटते आहे ती विजेती आहे आणि तिला परफ्यूम मिळणार आहे…

आता बघूया कोणाला गिफ्ट मिळणार … वीणा आणि शिवमधील मैत्री अशीच टिकेल का ? की यांच्यामध्ये गैरसमज होतील ? हे कळेलच… तेंव्हा नक्की बघा..