स्त्री आरोग्य तसा आपल्याकडे अजूनही बराच दुर्लक्षित विषय आहे. फार बोलल्या जात नसल्या तरी त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. बऱ्याच स्त्रियांना अनियमित मासिक पाळी, जास्त रक्तस्त्राव, गर्भधारणेस समस्या ह्यांसारख्या समस्या असतात. ह्याचे मुख्य कारण असू शकते PCOS. ह्याकडे वेळीच लक्ष द्या नाहीतर त्याचा तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होईल.

काय आहे PCOS?

PCOS म्हणजे Polycystic Ovary Syndrome. 2018 मध्ये झालेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले आहे की 2.2 – 26.7% महिलांना ही समस्या असते. घाबरून जाण्याची गरज नाही.

हा काही भयंकर रोग नाही शरीरात होणाऱ्या काही हार्मोनल बदलांमुळे ह्या समस्या उद्भवतात. ह्यावर वेळीच उपाय केले तर पुढे होणाऱ्या अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. प्रत्येक स्त्री तिच्या आयुष्यात एकदातरी ह्या समस्येला सामोरी जाते.

कसा होतो PCOS?

स्त्रियांमध्ये अंडाशयात सिस्ट तयार होतात. त्यामुळे वेळेवर हे बीज तयार होत नाहीत. ह्यातून अनियमित मासिक पाळी किंवा गर्भधारणेस समस्या निर्माण होतात.

ह्यामध्ये वजन वाढून लठ्ठपणा येतो. त्यामुळे इन्सुलिन मोठ्या प्रमाणात तयार होते परिणामतः स्त्रियांमध्ये पुरुष हार्मोन्सची जास्त प्रमाणात निर्मिती होते.

लक्षणे

  • अनियमित मासिक पाळी
  • प्रचंड रक्तस्त्राव
  • चेहरा, छाती आणि पाठीच्या वरच्या भागात पुरळ
  • पुरुषांप्रमाणे टक्कल पडणे किंवा केस पातळ होणे
  • त्वचेवर गडद चट्टे पडणे
  • त्वचेचा रंग गडद होणे
  • काही महिलांमध्ये डोकेदुखीचा देखील त्रास दिसून येतो

ह्याचा शरीरावर कसा परिणाम होतो?

  • वंध्यत्व
  • चयापचय विकृती
  • हृदयरोग, मधुमेह ह्यांचा धोका वाढतो
  • श्वासोच्छ्वासास त्रास
  • इंडोमेट्रिअल कॅन्सर
  • डिप्रेशन

रक्ततपासणी, अल्ट्रासाऊंड ह्यांसारख्या पध्दतीने PCOS चे निदान करता येऊ शकते.

उपाय

  • डॉक्टरांचा सल्ला आणि उपचार
  • वजन कमी करणे
  • अँटीइंफ्लामेट्री डाएट
  • DASH डाएट
  • फायबरयुक्त पदार्थांचे सेवन
  • मासे
  • डाळी

ह्या गोष्टी टाळा

  • रिफाईन कार्ब्स
    उदा.:- पेस्ट्री, ब्रेड
  • तळलेले पदार्थ
  • फास्ट फूड
  • सोया
  • डेरी प्रॉडक्ट्स

-भक्ती संदिप