आपल्या सहकारी क्रिकेटपटूंची चेष्टा-मस्करी करण्यात वीरेन्द्र सेहवागचा हातखंडा होता. मैदानावर वीरेन्द्र सेहवाग कितीही गंभीर असला, तरी मैदानाबाहेर त्याने आपल्या विनोदी स्वभावाची झलक दाखविली आहे. विनोदी, खुसखुशीत टिप्पणी करण्यापासून ड्रेसिंग रूममध्ये धमालमस्ती करण्याबद्दल भारताचा हा सलामीचा फलंदाज प्रसिध्द असला, तरी त्याने प्रथमच आपली ही विनोदी बाजू ‘झिंग गेम ऑन’ या चॅट शोमध्ये प्रेक्षकांना दाखविली आहे. कार्यक्रमचा सूत्रसंचालक करण वाही याच्याशी त्याने मनमोकळ्या गप्पा मारल्या. यावेळी करणने आपल्या घरच्या लोकांना वेगवेगळ्या नावांनी ओळखण्याच्या सवयीवर करणने ‘वीरू के घरेलू अ‍ॅवॉर्डस’ अशी टिप्पणी केली.

कारण आपल्या सहकार्‍्यांच्या फलंदाजी आणि गोलंदाजीच्या शैलीवरून वीरेन्द्रने त्यांना विविध टोपण नावे ठेवलेली आहेत. त्याने सांगितले ऋषभ पंतचे नाव सिलबत्ता आहे, तर रसेल हा पटकुना आहे, तर पंड्या बनला मसलदानी. तेव्हा करणने त्याला आपल्या सहकारी क्रिकेटपटूंना त्याने कोणती नावे बहाल केली आहेत, असे विचारल्यवर सेहवाग म्हणाल की राहुल द्रवीडला आपण छुपा रुस्तुम म्हणतो, तर हरभजनसिंहला त्याच्या व्यक्तिमत्त्वावरून आपण मसालेदार म्हणतो. युवराजसिंह हा पटाखा आहे. सौरव गांगुली हा मिक्सर ग्राइंडर आहे; तर सचिन तेंडुलकर हा संघातील सर्वात जाणकार फॅशनेबल खेळाडू आहे. वीरेन्द्रने स्वत:ला कुंभकर्ण अशी पदवी दिली आहे, कारण आपण जेव्हा आराम करीत असू तेव्हाच आपला सर्वाधिक लाभ झाला आहे, असे त्याने संगितले.

रविवार, 23 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 7.00 वाजता प्रेक्षकंना वीरेन्द्र सेहवागच्या रंगतदार व्यक्तिरेखेची अधिक ओळख करून घेता येईल ‘झिंग गेम ऑन’मध्ये फक्त ‘झिंग टीव्ही’वर!