ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

या मान्सून मध्ये पावसाचा आनंद घेण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत. या पावसाळ्यात झी टॉकीज तुमच्या भेटीस घेऊन येत आहे मागील दशकातील तुमच्या आठवणींशी जोडणारे खास १० ब्लॉकबस्टर चित्रपट. या लॉकडाउन मध्ये जुन्या चित्रपटांचा ट्रेंड वाढत असताना , या मध्ये भर घालण्यासाठी झी टॉकीज घेऊन येत आहे एक खास फिल्म फेस्टिवल “दशकातले दहा जुलै मध्ये पहा”. ६ जुलै ते १७ जुलै मध्ये दररोज संध्याकाळी ६ वाजता झी टॉकीज हे खास चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येणार आहे.

नाना पाटेकरांच्या अभिनयाने अजरामर झालेल्या नटसम्राट या शोकांतिक सिनेमाचे झी टॉकीज वर पुनरागमन होत आहे. नाट्य सृष्टीतून निवृत्त झालेल्या पण नाट्य सृष्टीच्या आठवणीत रमलेल्या कलाकाराचा निवृत्तीनंतरचा दुःखद प्रवास या चित्रपटात दाखवण्यात आलेला आहे. ६ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. २०१६ सालचा आपल्या सगळ्यांच्या लक्षात राहिलेला सुपरहिट चित्रपट म्हणजे सैराट. परश्या आणि आर्ची या जोडप्याला कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न केल्याने किती मोठी किंमत मोजावी लागते , हे या चित्रपटाद्वारे मांडण्यात आलेलं आहे. ‘एक विलक्षण प्रेमकहाणी’ म्हणून ओळखला जाणारा काकस्पर्श ८ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे . चित्रपट सृष्टीतील समीक्षकांनी या चित्रपटाचं भर भरून कौतुक केलं आहे.सचिन खेडकर, मेधा मांजरेकर, प्रिया बापट, सविता मालपेकर, केतकी माटेगावकर या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. रंपाट हा चित्रपट ९ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. मिथुन आणि मुन्नी हे २ उदयोन्मुख कलाकार अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबई मध्ये येतात, आणि मग सुरु होतो त्यांच्या स्वप्नांचा प्रवास.सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख मिरवणाऱ्या पुण्याला गुन्हेगारीचं लागलेलं ग्रहण आणि यात अडकलेली तरुणाई. प्रवीण तरडे दिग्दर्शित मुळशी पॅटर्न प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे १० जुलै रोजी.एका छोट्या खेड्यात राहणाऱ्या ८ वर्षांच्या चैतन्य भोवती गुंफलेला नाळ १३ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमा गृहात सलग १०० दिवस हाऊसफुल अशी पाटी झळकवणारा लय भारी १४ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रितेश देशमुख ने या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं आहे. तर अभिनेत्री जेनेलिया डिसुझा आणि अभिनेता सलमान खान यांनी या चित्रपटात छोट्या भूमिका साकारल्या आहेत. नगरपालिकेत झाडूवाला असणारा आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी धडपडणाऱ्या बबन ला एके दिवशी पैशांची खाण मिळते. या मुळे तो कसा कटुंबापासून दुरावला जातो आणि स्वतःचा विनाश करून घेतो, पाहायला विसरूनका नशीबवान १५ जुलै रोजी. २०१५ साली देऊळ बंद या चित्रपटाद्वारे प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शनात प्रदार्पण केले.देवावर विश्वास नसणाऱ्या शास्त्रज्ञाची गोष्ट या चित्रपटात दाखवण्यात आलेली आहे. अभिनेता गश्मीर महाजनी मुख्य भूमिका साकारत असून मोहन जोशी, दीपक करंजीकर, निवेदिता सराफ या कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. १६ जुलै रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या फिल्म फेस्टिवल ची सांगता १७ जुलै रोजी एलिझाबेथ एकादशी या चित्रपटाने होणार आहे.बाबांनी दिलेली एलिझाबेथ हि सायकल ज्ञानेश आणि मुक्ता या भावंडांना काही कारणांमुळे विकावी लागते. या भावंडांची सायकल परत मिळवण्यासाठी चाललेली धडपड या चित्रपटाद्वारे रेखाटण्यात आलेली आहे. तर पाहायला विसरूनका विशेष चित्रपट महोत्सव दशकातले दहा ..जुलै मध्ये पहा दररोज संध्याकाळी ६ वाजता फक्त आपल्या झी टॉकीज वर.