vku

 

विकता का उत्तरमध्ये अवतरले ‘नटसम्राट’
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणीना उजाळा

‘टू बी ऑर नॉट टू बी… ‘ हे शब्द कानावर पडताच, डोळ्यासमोर उभे राहतात ते  Natsamrat ‘नटसम्राट’ ! थोरामोठ्यांपासून ते अगदी शाळकरी मुलांना अवगत असलेले हे नटसम्राट विविध रुपात आपल्याला पाहायला मिळतात. असेच एक ‘नटसम्राट’ विकता का उत्तर या स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रसिद्ध कार्यक्रमात पाहायला मिळणार आहेत. मुंबईचे ६४ वर्षीय गृहस्थ सुहास नार्वेकर यांनी साकारलेली नटसम्राटांची भूमिका अंगावर रोमांच उमटविणारी ठरणार आहे. आय. टी . कन्सल्टंट म्हणून अनेकवर्ष विविध शहरात त्यांनी काम केले होते, निवृत्तीनंतर ते सॉफ्टवेअर डेवलपमेंटचे काम करीत आहेत. प्रगल्भ वाचन आणि प्रतिभावंत असलेले सुहास नार्वेकर यांचे व्यक्तिमत्व रसिकांना भारावून टाकणारे आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे माजी दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची एक आठवण त्यांनी सदर कार्यक्रमात शेअर केली.
१९९५ साली Vilasrao Deshmukh विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सुहास यांचा त्यांच्याशी परिचय झाला होता. त्यावेळी सुहास आय. टी. सेक्टरमध्ये कामाला होते. त्यादरम्यान सुहास आणि विलासराव देशमुखांचे आय.टी. संदर्भात काही बोलणे झाले होते. मात्र ही भेट अंशकालीन असल्याने विलासराव आपल्याला स्मरणात ठेवतील अशी कल्पना देखील सुहास यांना नव्हती. कालांतराने विलासराव देशमुख २००४ साली पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदावर रुजू झाले, मात्र त्याकाळात सुहास सेवानिवृत्त झाले होते.

असे असले तरीही त्यांनी सुहास यांची जातीने दखल घेत एका सॉफ्टवेअर डेवलपर्सच्या प्रमुख पदावर काम करण्याविषयी त्यांना घरी पत्र पाठवले होते. इतक्या मोठ्या पदावर काम करण्याची ही संधी माझ्यासाठी स्वप्नच होते, अशी एक अविस्मरणीय आठवण सुहास यांनी सांगितली. आपल्या वडिलांची ही आठवण ऐकताना कार्यक्रमाचा होस्ट असणाऱ्या रितेशला त्याच्या भावना आवरता आल्या नाहीत. रितेशनेदेखील आपल्या आठवणींना उजाळा देत त्याचे आणि त्याच्या वडिलांच्या नात्याबद्दलचे अनेक वेगळे पैलू मांडले. ‘विकता का उत्तर’ चा हा विशेष भाग यंदाच्या आठवड्यात पाहायला मिळणार आहे. येत्या २, ३ आणि ४ डिसेंबर रोजी सादर होणारा हा भाग महाराष्ट्राच्या रसिकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here