Virus ! New Marketing Strategy to Hook The Audience

मुंबईसह महाराष्ट्रात व्हायरसचे थैमान.
कोण पसरवतोय हा व्हायरस आणि का?

मागील काही दिवसांत, मुंबईसह सबंध महाराष्ट्रात एक नवा व्हायरस पसरलेला दिसतोय. काही दिवसांपूर्वी अचानक सगळीकडे ‘Virus – याला उतारा नाही’ असा इशारा देणारी पोस्टर्स दिसायला लागली आणि या सगळ्या प्रकरणाची सुरुवात झाली. लवकरच या पोस्टर्सचे व्हिडीओज Whatsapp आणि फेसबुकवर सगळीकडे पसरू लागले.
पण आज सकाळी, एक नवीन व्हिडीओ प्रसारीत झाला आहे, ज्यात चेहरा झाकलेला एक अनोळखी संशयित इसम हा व्हायरस अपलोड करताना आपल्याला दिसतो.
हा व्हायरस नेमका आहे तरी काय? ट्रोजन प्रकारातील काही व्हायरस आहे की तो सॉफ्टवेअर्सवर परिणाम करून आपली यांत्रिक उपकरणे बंद पाडेल? हा व्हायरस स्मार्टफोन्स, कॉम्पुटर्सद्वारा पसरणारा आहे मनुष्याद्वारे?
त्या अनोळखी संशयिताची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत, पण त्या व्यक्तीचा यामागील उद्देश अद्याप समजलेले नाही.

 

आवाहन

आम्ही आपणाला सुचवू इच्छितो की, या संशियाताच्या हालचालींवर लक्ष असू द्यावे. तुम्ही या संशयिताच्या नव्या चित्रफितीमध्ये पाहू शकता की तो एका कॉर्पोरेट ऑफिसमध्ये रात्रीच्या अंधारात घुसखोरी करून हा धोकादायक व्हायरस सिस्टीममध्ये अपलोड करतो. अशा प्रकारच्या संशयित हालचालींबाबत सतर्क राहावे. या संशयिताचा शोध घेणे सुरू आहेच. आम्ही अपेक्षा करतो, लवकरच यासंबंधी काही बातमी पुढे येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here