अखेर व्हायरस चे सत्य उलगडले!!
संतोष कोल्हेंची नवीन वेबसिरीज!!
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये Virus ने थैमान घातला आहे. एक मुखवटाधारी व्यक्ती हा Virus अपलोड करताना एका व्हिडीओ क्लिप मध्ये आपल्या समोर आली. पण हा Virus नेमका आहे  तरी काय? आणि ही व्यक्ती हे सगळं का करते या प्रश्नांना उत्तरंच मिळालं नव्हतं. या प्रश्नांनी सबंध महाराष्ट्राला भंडावून सोडले होते. आज हा Virus नेमकं काय आहे याचा उलगडा झाला आहे. हा Virus दुसरंतिसरं काहीही नसून मनोरंजन विश्वात “Virus मराठी” या नावाने लवकरंच येणारं नवीन युट्युब चॅनेल आहे. हा Virus ज्याने अपलोड केला होता ती व्यक्ती दुसरंतिसरं कोणीही नसून दिग्दर्शक संतोष कोल्हे आहेत. त्यांनीच हे युट्युब चॅनेल सुरु केलेलं आहे. या मराठमोळ्या युट्युब चॅनेलद्वारे ‘Awesome Twosome’ आणि ‘Shock कथा या दोन आगळ्यावेगळ्या वेब सिरीज आपल्यासाठी घेऊन येत आहेत.
२८ मार्चपासून युट्युबवर आपल्याला ‘Virus मराठी’ या वेब चॅनेलच्या मनोरंजनाची मजा घेता येईल. या वेब चॅनेलचे दिग्दर्शक संतोष कोल्हे यांनी याआधी हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रामध्ये क्योंकी सास भि कभी बहु थी, कहाणी घर घर कि, कुसुम, बंदिनी, बैरी पिया, सौभाग्यवती भवं अश्या मालिकांचे दिग्दर्शन केलं आहे, तसेच मराठीमध्ये भटकंती, सांजसावल्या, ढोलकीच्या तालावर, झुंज मराठमोळी, डिस्कव्हर महाराष्ट्र या मालिकांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं आहे. आणि आता ते ‘Virus मराठी’ या नावाने एक नवीन मराठी वेब चॅनेल जगभर पसरलेल्या तमाम मराठी लोकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहेत.
कसं असेल हे नवं वेब चॅनेल आणि काय घेऊन येणार आहे आपल्यासाठी नवीन हे जाणून घेण्यासाठी २८ मार्चपासून पाहायला विसरू नका ‘Virus मराठी’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here