पेशाने उद्योगपती आणि दूरचित्रवाणीचा अभिनेता, जागतिक पातळीवरचा व्यक्ती महाराष्ट्रातल्या युट्युब सिरीजमुळे आणखी लोकप्रिय झाला .२०१६ च्या अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीनंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात घर तर केलंच पण काही दिवस हा व्यक्ती डोक्यातून जात नव्हता. राष्ट्राध्यक्ष झाल्यावर संपूर्ण जगभरात ज्याच्या नावाची चर्चा रंगत होती त्याची एक वर्षांपूर्वी विशेष चर्चा महाराष्ट्रात रंगात आली होती .तो म्हणजे डोनाल्ड ट्रम्प … बरोबर ओळखलं जिगऱ्या आपला खास रे टी.व्ही.वरचा ट्रम्प तात्या.


कोणतीही पार्श्वभूमी नसताना बघता बघता ट्रम्प तात्यासहित खास रे टी.व्ही. हे नाव मोसमी वाऱ्यासारखं महाराष्ट्रात फिरत होत.खास रे टी.व्ही. वरचा ट्रम्प तात्याने अक्षरशः भल्याभल्यांना दखल घ्यायला भाग पाडले.मोठमोठया लोकांनी तर चोरून का होईना ट्रम्प तात्याला ऐकलच असेल कारण तात्याचा विडिओ बघायच टाळनं म्हणजे खळखळून हसण्याची संधी गमावन
जागतिक पातळीवरचा डोनाल्ड ट्रम्पला खास रे टी.व्हीने महाराष्ट्राच्या दुनियेत आणलं तेही आपला मराठमोळा ,रांगडा गावरान बाज राखत .ट्रम्पच्या गावरान भाषाशैलीने प्रत्येकजण विडिओ पॉज करून खळखळून अक्षरशः पोट धरून हसत होता .

जिगऱ्या ही सगळी कमाल आहे खास रे टी.व्हीची . नव्याने सुरू झालेल्या ह्या युट्यूब चॅनलने प्रचंड लोकप्रियता मिळवली.काही लोकांनी तर ट्रेंड आणि वायरलची एका शब्दात व्याख्याच खास रे टी.व्ही. अशी केली .ट्रम्प तात्याच लेजिमच्या, हलगीच्या कडकड्यात झालेलं स्वागत ,तात्याने तरुण मुलामुलींना दिलेलं मार्गदर्शन ,बाहुबली मुरंबावर खास रिव्ह्यू ,भारत पाकिस्तानच्या मॅचच्या निमित्ताने स्वतःच्या सांगितलेल्या आठवणी,दिलखुलास दिलेली मुलाखत ह्यामुळे डोनाल्ड ट्रम्प हा अमेरिकेचा नसून आपल्या गल्लीतला ,चाळीतला,चौकातला ,शहरातला,जिल्ह्यातला,वाटू लागला होता .
युट्युबवर आज कित्येक गाजलेले लोकप्रिय चॅनल आहेत .गाजलेल्या चॅनलमध्ये खास रे टी.व्ही. नेही नाव कोरल.
खास रे टी.व्हीच्या आगळ्या वेगळ्या ट्रम्प तात्याच्या सिरीजला तमाम महाराष्ट्राने प्रचंड प्रतिसाद दिला .एवढंच काय तर आजही मराठी न्युज चॅनलवर डोनाल्ड ट्रम्पची बातमी असेल तर ट्रम्प तात्या असाच उच्चर करून बातमी दाखवली जाते.
प्रेक्षकांचं पहिल्यांदाच एवढं भरभरून प्रेम, प्रसिद्धी मिळवल्यानंतर खास रे टी.व्ही.वर हीच लोकप्रियता टिकवून ठेवण्याची मोठी जबाबदारी आली .

खास रे टी.व्ही.ला लोकप्रियतेबद्दल कधीच शंका वाटत नाही कारण त्यांनी प्रेक्षकांची नाळ ओळखली आहे ,ट्रेंड कसा बनवायचा हे त्यांना चांगलंच समजलं .  हटके, आकर्षक धाटणीचे कंटेंट ह्या जोरावर खास रे टी.व्ही. प्रेक्षकांच्या हृदयात जागा घेत राहणार यात शंका नाही . जिगऱ्या खास रे टी.व्ही. म्हणजे लंबी रेस का घोडा है. एवढ्यावरच न थांबता पुढे असेच गाजलेले कंटेंट महाराष्ट्राला दिले . तात्यानंतर महाराष्ट्राच्या मातीत नाव कोरण्याच भाग्य होत पाब्लो एमिलियो एस्कोबार गॅव्हीरियाच .म्हणजेच आपल्या पब्लोशेठनेसुद्धा महाराष्ट्राच्या मनावर अधिराज्य गाजवलं .त्यांनंतर डेडपूल आला आणि थेटभेटमधला निकी जिगर खट्याळ ,जे आहे ते तोंडावर बोलणारा,रोखठोक,सडेतोड.

निक्किच्या बिनधास्त बोलून खेचण्याच्या स्टाईलला हसण्याशिवाय पर्याय नसतो . निक्की जिगर किरकोळ लोकांची खेचत नाही तर मोठमोठ्या अभिनेत्यांना निक्कीसमोर गार पडाव लागत .निक्की सुद्धा इतका प्रसिध्द झाला की मराठीतले लोकप्रिय अभिनेते निक्कीला विनंती करतायत मला बोलवं आणि माझी खेच . खास रे टी.व्ही. च्या ह्या सगळ्या सिरीज कमालीच्या गाजल्या .तमाम महाराष्ट्राने ह्या सिरीजवरती भरभरून प्रेम केलं. तर जिगऱ्या खास रे टी.व्हीची नवीन वेबसिरीज आपल्या भेटीला येत आहे .वेब जगताच्या इतिहासात पहिल्यांदाच एकांकिकेवर आधारित ‘वायरल’ ह्या सिरीजचा ट्रेलर नुकताच युट्युब चॅनलवर रिलीज करण्यात आला .

लोकांचे डोळे उघडलेत , हुशार झालेत आता मतासाठी पैशे जरी दिले तरी आपले पैशे घेऊन आपल्यालाच मत देतील याची शाश्वती नाही म्हणून निवडणूक जिंकण्यासाठी प्रचाराचे अनेक फंडे वापरलेले फोटो व्हिडिओस वायरल झालेले आपण सध्या बघतोय .परवा तर काय हेमा मालिनीचा चक्क गव्हाच्या शेतात जाऊन गव्हाची कापणी करतानाचा विडिओ वायरल झाला ,निवडून आल्यानंतर लोकांचं पाच वर्षे तोंडसुद्धा न बघणाऱ्या एका उमेदवाराचा सध्या सामन्य कुटुंबाच्या घरात व्हरांड्यात बसून सगळयांना प्रेमाने घास भरवतानाचा विडिओ वायरल झाला. हिरोईन दिसल्यावर पब्लिक पाहण्यासाठी वेडे तर होणारच तर गाडीच्याभोवती लोक घुटमळताना बघून काचा खाली न करणाऱ्या उर्मिला मातोंडकर तर पब्लिकमध्ये जाऊन रिक्षात बसून सेल्फी काढून आल्याचा विडिओ आणि फोटो वायरल झाले. सांगण्याचा मुद्दा एवढंच की असेच अनोखे फंडे वापरून लोकांच्या चर्चेत येऊन भुरळ पडण्याच्या नियोजनात ‘वायरल’ च्या ट्रेलरमधला भाऊ दिसतोय.
यासाठी ट्रेलरमधला भाऊ वायरल जरी व्हॅच म्हंटल तर कोणत्या विषयावर विडिओ बनवायचा याच कार्यकर्त्यांसोबत भाऊ नियोजन करताना दिसत आह .ट्रेलरमध्ये वैतागलेले भाऊंचे वडील आहेत त्यांच्या डायलॉगमुळे भाऊच्या अतरंगी विचित्र स्वभावाचा अंदाज येतो .

भाऊच्या विरोधात एक उमेद्वारसुद्धा आहे आभ्या . याने तर पहिल्याच डायलॉगमध्ये राडा केला . वायरल मध्ये भाऊची गावरान सुंदर अशी एक गिर्लफ्रेंडसुद्धा दिसतेय .भाऊ आणि चिऊ ची ही अनोखी जोडी लय फेमस होणार यात शंका नाही .ट्रेलरमध्ये भाऊंची हवा करणार एक मजेदार गाण्याची झलकसुद्धा बघायला मिळाली .गेला विडिओ वायरल भाऊ फेमस झाला ह्या गाण्याच्या पंचलाईन वरून तर असा अंदाज येतोय की भाऊचा हा वायरल फंडा बहुतेक यशस्वी होतोय पण अंदाज लावून काय निष्कर्ष काढणार त्यासाठी सगळे एपिसोड पाहायला लागणार .एपिसोडच्या शेवटी सायलेंट म्युझिक एपिसोडची आतुरता मात्र वाढवते .एकंदरीत वायरलच्या ट्रेलरमधून बऱ्याच विलक्षण मजेदार हटक्या विषयाचा अंदाज येतोय खरा पण पूर्ण सिरीज पाहणे उत्सुकतेचे आहे .भाऊने वापरलेल्या अनोखा फंडा यशस्वी होतोय की त्याच्या अंगलट येतोय हे पाहणे उत्सुकतेचे आहे .

ट्रॅलरने तर अनेकांची मने भारावून गेलीयेत मात्र एपिसोड बघण्याची उत्सुकता तानायला नको म्हणजे बर . नावाप्रमाणेच ‘वायरल’ ही सिरीज वायरल होणार यात शंकाच नाही.