सध्या सोशल मीडियावर एकच गोष्ट चर्चेत आहे, की विराट बाप आणि अनुष्का आई झाली. आणि त्यांच्या घरी लक्ष्मी आली. म्हणजे मुलगी झाली हो. याची माहिती आधी विराट ने दिली होती. इंस्टा वर. आता सर्वाना म्हणजे चाहत्यांना सर्वाना हे कळलेलं आहे.

त्यात पुन्हा चर्चा उठली आहे, ती म्हणजे की अनुष्का आणि विराट यांनी नवीन घरात जाण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे आता त्यांची कन्या नव्या कितीतरी कोटींच्या घरात पाय ठेवणार आहे. तर चला नेमकं किती कोटींच्या घरात पाय ठेवणार मुलगी पाहुयात.

भारतातील सर्वात जास्त चर्चेत असणारे जोडपे विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सोमवारी आईवडील झाले आहेत. मुलीच्या जन्मानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यात येत आहेत.

आज आम्ही तुम्हाला विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या घराविषयी माहिती सांगणार आहोत. विराट आणि अनुष्काची मुलगी याच घरात राहणार असल्याने आज आम्ही तुम्हाला या घराची किंमत आणि इतर अनेक गोष्टी सांगणार आहोत. या फोटोत विराट कोहली घराच्या बाल्कनीतून सेल्फी घेताो विराट आणि अनुष्काची मुलगी याच घरात राहणार आहेत. या फोटोत विराट कोहली घराच्या बाल्कनीतून सेल्फी घेताना दिसून येत आहे.

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघेही सोशल मीडियावर सक्रिय असतात. आपल्या या घराचे फोटो ते नेहमी सोशल मीडियावर शेअर करत असतात.

दिवाळी किंवा करवा चौथ या सणांच्या दिवशी विराट आणि अनुष्का आपले फोटो शेअर करत असतात. या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का करवा चौथच्या दिवशी फोटो काढताना दिसून येत आहेत.

मुंबईतील वरळीमधील ओंकार 1973 अपार्टमेंटमध्ये सध्या दोघेही राहत आहेत. 2017 मध्ये विराटने हे अपार्टमेंट खरेदी केले असून तेव्हापासून तो मुंबईमध्ये राहत आहे.

माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार विराट कोहलीच्या आणि अनुष्का शर्माच्या घराची किंमत ही 34 कोटी रुपये आहे.

आता ती 34 कोट्यवधी असणाऱ्या घरात जाणार आहे. बघा म्हणजे पैसे असेल तर मग कुणी काहीही करू शकतो. तसं त्या दोघांनी कष्टाने कमवल आहे सगळं. त्यांना नवीन जीवनाच्या शुभेच्छा.