लव्ह लग्न लोचा मधील विनय आकांशाचे होणार शुभमंगल सावधान !!

झी युवावर सोमवार ते शनिवार रोज रात्री ८:३० वाजता येणाऱ्या लव्ह लग्न लोचा या मालिकेला वर्ष होऊन गेले तरीही या मालिकेचा गोडवा काही संपत नाही आहे . प्रेक्षकांच्या दृष्टीने लव्ह लग्न लोचा ही एक मस्तजमून आलेली मालिका आहे . प्रेक्षकांच्या मानसिकतेचा बारकाईने विचार करून गुंफलेली पटकथा आणि प्रत्येक कलाकाराचा (प्रचंड)अवाका अोळखून रचलेले प्रसंग , आणि कलाकारांनी त्यावर केलेली मेहनत पाहूनलेखक,दिगर्शकालाही चेव येणं साहजीकच आहे . या मालिकेतील प्रत्येक कलाकार हा आता अनेकांच्या घरातील एक सदस्य झालेला आहे .

यातील राघव , विनय , अभिमान , शाल्मली , काव्या , आकांशा , श्रीकांत आणिआता नवीन आलेले पण या लव्ह लग्न लोचा च्या कुटुंबात पूर्णपणे मुरलेले ऋता आणि राजा या सर्वांच्याच अभिनयाला प्रेक्षक मनापासून दाद देतात  यात घडणारे सगळेच लोचे आता सर्वांनाच स्वतःचे आपले वाटतात. मगराघवच नक्की प्रेम कोणावर ? काव्य आणि ऋता चा वाद संपणार का, गावावरून आलेला राजा या कुटुंबात एकरूप होईल का ?  अभिमानान शाल्मली च बाळ नक्की कोणावर जाणार , श्रीकांत खरंच चांगलं वागतोय किनाटक करतोय आणि सर्वात महत्वाचा यक्ष प्रश्न म्हणजे विनय आणि आकांशा यांचे लग्न होणार कि नाही ??

… या सर्व प्रश्नांची उत्तरे हि मालिका पाहता पाहता प्रेक्षकांना टीव्ही समोर खिळूवून ठेवत आहेतच पण आतायातील  विनय आणि आकांक्षांच्या लग्नाचा प्रश्न मात्र छानप्रकारे सुटला आहे . सध्या मालिकेत सगळी मंडळी विनय आणि आकांशाच्या लग्नाची तयारी करत आहेत .  

त्यात आता बॅचलर पार्टी होणार आहे , त्यात लोचे नाहोऊन कसे चालेल आता पाहायला मजा येणार आहे विनय आणि आकांशाच्या लव्ह मुळे होणाऱ्या लग्नात किती लोचे होतात ते ..