मित्रांनो! आपल्या बॉलीवूड फिल्म इंडस्ट्री प्रमाणेच तिकडे दक्षिणेस टॉलीवूड, मॉलीवूड, अशा साऊथ फिल्म इंडस्ट्रीज आहेत. आजकाल या दाक्षिणात्य चित्रपटांची छाप बॉलीवूड मधील अनेक चित्रपटांवर पहावयास मिळते. साऊथ चे अनेक चित्रपट हिंदीत डब होऊन तुफान गल्ला कमावतात. त्यांचे रजनीकांत, कमला हसन, मोहनलाल, चिरंजीवी, नागार्जुन, मामुटी, सेतूपथी, धनुष आणि असे अभिनेते देशभर फेमस आहेत.
थलपथी विजय हा अशाच लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. विजयचा नुकताच २२ जून रोजी वाढदिवस झाला. आज विजय ४७ वर्षांचा झाला आहे. विजयने आता पर्यंत ६४ पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. विजयने त्याच्या अभिनय आणि डान्सच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हाच विजय भारतातील सर्वात श्रीमंत कलाकारांपैकी एक आहे. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपण त्याच्या संपत्ती बद्दल जाणून घेऊया.
२०२१ मध्ये त्यांची एकूण संपत्ती ही सुमारे ४१० कोटी रुपये इतकी असल्याचे सांगितले जाते. विजयचे वार्षिक उत्पन्न हे १०० ते १२० कोटींचे आहे. विजय दरवर्षी एका ब्रॅंडची जाहिरात करण्यासाठी जवळपास १० कोटी रुपये घेतो. विजय कोका -कोला, चेन्नई सुपर किंग्जसाठी आणि इतर काही ब्रॅंडसाठी काम करतो.
विजयला लक्झरी गाड्यांची आवड आहे. त्याच्याकडे रोल्स रॉयस घोस्ट गाडी आहे, ज्याची किंमत ही ६ कोटीच्या जवळपास आहे. ऑडी ए८ ही गाडी जवळपास १.३० कोटीच्या जवळपास आहे. बीएमडब्ल्यू सीरिज ५ या गाडीची किंमत ही ७५ लाख रुपयाच्या आसपास आहे. बीएमडब्ल्यू एक्स ६ या गाडीची किंमत ही ९० लाख रुपये आहे. मिनी कूपर या गाडीची किंमत ही ३५ लाख रुपये आहे.
विजयने त्याचा आगामी चित्रपट ‘बीस्ट’साठी १०० कोटी रुपयांच मानधन घेतलं आहे. १०० कोटी रुपयांचे मानधन घेत विजयने लोकप्रिय अभिनेते रजनीकांत यांना मागे टाकलं आहे. तामिळ अभिनेत्यांमध्ये सगळ्यात जास्त मानधन घेणारे अभिनेते रजनीकांत होते. ”बीस्ट’ या चित्रपटासाठी आकारलेल्या या मानधनामुळे तामिळ चित्रपटातसृष्टीत सगळ्यांत जास्त मानधन घेणार अभिनेता विजय ठरला आहे.
विजयने त्याच्या दोन चित्रपटांसाठी १३० कोटी रुपये फी घेतली. विजयला बिगिल आणि मास्टर या चित्रपटासाठी ही फी मिळाली आहे सूत्रांच्या मते विजयला बिगिलसाठी ५० कोटी आणि त्याच्या आगामी चित्रपट मास्टरसाठी ८० कोटी मिळाले. विजयच्या घरावर प्राप्तिकर विभागाने छापासुद्धा टाकला होता.
प्राप्तिकर विभागाच्या छाप्यानंतर दक्षिण चित्रपटांचा सुपर अभीनेता थलपथी विजय काही दिवसांपासून चर्चेत आहे. कर चुकवणे आणि फायनान्सर अंबू यांच्याशी संबंध असल्याच्या आरोपा पोटी प्राप्तिकर विभागाने विजय यांना समन्स बजावले होते, पण सर्व कायदेशीर कागदपत्रे पाहून आता अधिकायांनी जाहीर केले आहे की अभिनेत्याने त्याचा सर्व कर भरला आहे.