मित्रांनो! सुपरहिट मराठी चित्रपट मुळशी पॅटर्नच्या प्रेमात पडलेल्या सलमान खान ने त्याचा हिंदी रिमेक काढला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या त्याच्या टीजरने दर्शक आणि चाहत्यांची उत्सुकता वाढवल्यानंतर आता, ‘विघ्नहर्ता’ या जबरदस्त गाण्याचा संपूर्ण ट्रॅक रिलीज झाला आहे आणि याला मिळणारा दर्शक आणि चाहत्यांचा प्रतिसादसुद्धा जबरदस्तच आहे. ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ची हाय-ऑन एनर्जी फेस्टिव डांस ट्रॅकमध्ये सलमान खान, आयुष शर्मा आणि वरुण धवन या गणपतीत दर्शकांना नक्कीच थिरकवणार ‘विघ्नहर्ता’च्या तालावर! टीजरला दर्शकांसाठी प्रदर्शित केल्यानंतर, याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून कलाकारांच्या चाहत्यांकडून याचे भव्य स्वागत होत आहे.

या ट्रॅकमध्ये वरुण आणि आयुष यांच्या ऊर्जावान डांस स्टेप्स असून कानसेनांसाठी एक कर्णमधुर पर्वणी आहे. ट्रॅकचा टोन आणि व्हिज्यूअल्सची भव्यता शानदार असून यातील रंगसंगतीला शाही आणि अलंकारीकतेने दर्शविण्यात आले आहे, जो निश्चितपणे दर्शकांचे लक्ष्य आपल्याकडे आकर्षित करेल आणि त्यांच्या मनात आपले खास स्थान निर्माण करेल.सलमान खान आणि त्याचा मेहुणा आयुष शर्माचा आगामी चित्रपट ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ प्रचंड चर्चेत आला आहे. अलीकडेच सलमानने या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. त्याने ‘गणपती बाप्पा’ हे नाव घेऊन ही पोस्ट शेअर केली आहे. यासह, चित्रपटाबद्दल काही डीटेल्स देखील एका ओळीत सांगितले गेले आहेत.

सलमान खानने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, जे ‘अंतिम’ चे पहिले पोस्टर आहे. या पोस्टरमध्ये सलमान खान पगडी घातलेल्या रोडी लूकमध्ये दिसत आहे. त्याचवेळी आयुष शर्मा त्याच्या समोर उभा आहे. या पोस्टरमध्ये सलमान खान खाकी वर्दीमध्ये बाईकवरही दिसत आहे. या व्यतिरिक्त आयुष शर्मा हातात रिव्हॉल्वर घेऊन कोणाची हत्या करत आहे. हे पोस्टर पाहून हे स्पष्ट झाले आहे की चित्रपटात सलमान आणि आयुषची चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानने ‘गणपती बाप्पा’ नावाने ‘अंतिम’ चे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरसह कॅप्शनमध्ये सलमानने लिहिले- ‘वाईटाच्या अंताची सुरुवात. गणपती बाप्पा मोरया #Antim ‘… त्याचवेळी चाहत्यांना हे पोस्टर खूप आवडले आहे. या पोस्टवर मिळालेल्या कमेंट्स बघता सलमानच्या चाहत्यांची चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. कॅप्शनवरून हे स्पष्ट झाले आहे की, चित्रपटात सलमान वाईट लोकांशी तीव्र लढा देताना दिसणार आहे. महेश मांजरेकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.