व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्सतर्फे 2018 मधील पहिला मराठी चित्रपट ‘आपला मानूस
 व्हायकॉम 18 ने नेटवर्कचा यावर्षीचा पहिला प्रादेशिक मराठी चित्रपट असलेल्या ‘आपला मानूस’ या आगामी मराठी चित्रपटाची आज घोषणा केली. प्रसिद्ध दिग्दर्शक सतीश राजवाडे याचे दिग्दर्शन असलेल्या कौटुंबिक थ्रिलर चित्रपटात नाना पाटेकर, सुमीत राघवन आणि इरावती हर्षे यांच्या मुख्य भूमिका आहेत. नवऱ्याच्या वडिलांसोबत राहणाऱ्या, शहरी जीवनशैलीच्या दबावाचा सामना करणाऱ्या आणि नातेसंबंधांची गुंतागुंत हाताळणाऱ्या एका तरुण दांपत्याची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे. एक अनपेक्षित घटनेमुळे त्यांना त्यांची दैनंदिन आयुष्य आणि कुटुंबाबद्दल संशय घेणे भाग पडते. ‘आपला मानूस’द्वारे अजय देवगण निर्माता म्हणून प्रादेशिक चित्रपटांच्या क्षेत्रात प्रवेश करत आहे. हा चित्रपट 2018 मध्ये प्रेक्षकांसाठी प्रमुख आकर्षण ठरेल ते त्यातील उत्तम कलाकार व त्याला जोड देणाऱ्या उत्तम कथानकामुळे. यासोबतच व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्स, अजय देवगण फिल्म्स, वॉटरगेट प्रॉडक्शन आणि श्री गजानन चित्र या उद्योगातील चार डायनेमोच्या दृष्टिकोनासाठीही हा चित्रपट महत्वाचा ठरेल.
आगामी उपक्रमाबद्दल बोलताना व्हीकॉम 18 मोशन पिक्चर्सचे सीओओ अजित अंधारे म्हणाले, “फक्त बॉक्स ऑफिस कामगिरीच्या दृष्टीने नाही, तर विषयांच्या वैविध्यामुळेही गेल्या काही वर्षांमध्ये मराठी चित्रपटांचा  प्रेक्षकवर्ग प्रचंड प्रमाणात वाढला आहे. ‘आपला मानूस’ हा एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट असून तो प्रेक्षकांना हळवे बनवेल. अजय देवगण फिल्म्स, वॉटरगेट प्रॉडक्शन आणि श्री गजानन चित्र यांच्याबरोबर या प्रवासाला सुरुवात करताना आम्हाला खात्री आहे, की हा चित्रपट इतरांपेक्षा वेगळा ठरेल.  व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्सच्या प्रादेशिक क्लस्टरला करण्याच्या हेतूसह ही भागीदारी सर्वांसाठी फायदेशीर ठरेल, याची आम्हाला खात्री आहे.”
प्रादेशिक चित्रपटांसाठी अजय देवगण फिल्म्स आणि व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्स यांच्यातील भागीदारी आणि या घडामोडीबद्दल बोलताना अजय देवगण म्हणाले, “माझ्या 25 वर्षाच्या चित्रपट कारकिर्दीत माझे प्रेक्षक आणि चाहत्यांसोबतचे नाते अधिकच मजबूत झाले आहे. अनेक वर्षांत मला मिळालेल्या पाठिंबा आणि प्रेमामुळे माझ्या चाहत्यांना आणखी बरेच काही द्यावे, असे मला नेहमी वाटत आले आहे. निर्माता म्हणून ‘आपला मानूस’ हा माझा महाराष्ट्रातील लोकांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा पहिला प्रयत्न आहे आणि सर्व जण त्याचे कौतुक करतील, अशी मला आशा आहे. व्हायकॉम 18 शी आमचे आधीच असलेले नातेसंबंध या चित्रपटाद्वारे प्रादेशिक चित्रपटांमध्येही पुढे जात आहे.”
या सहकार्याबद्दल बोलताना व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्स मराठी आणि कलर्स मराठीचे बिझनेस हेड निखिल साने म्हणाले, “गेल्या पाच वर्षात मराठी चित्रपटांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्याने आपल्या नावीन्यपूर्ण कथाकथनाच्या आणि अनोख्या संकल्पनांनी अन्य कोणापेक्षाही अधिक प्रभाव टाकला आहे. ‘आपला मानूस’ ही 2018 मधील व्हायकॉम 18 ची पहिली निर्मिती असेल. आपल्या प्रभावी अभिनय व संवाद कौशल्यांमुळे प्रत्येक मराठी माणसाच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे अष्टपैलू कलाकार  नाना पाटेकर  आणि जबरदस्त कथानकासह ‘आपला मानूस’ संकटांशी झुंजणाऱ्या आणि आयुष्यात काहीतरी अनपेक्षितपणे अशुभ घडण्याच्या सावटाखाली असलेल्या कुटुंबाचा प्रवास टिपण्याचा प्रयत्न करेल. हा एक विवेकी चित्रपट असून प्रेक्षकांना तो भावेल, याची मला खात्री आहे.”
अजय देवगण फिल्म्सवॉटरगेट प्रॉडक्शन आणि श्री गजानन चित्र यांची निर्मिती असलेला ‘आपला मानूस 9.2.2018 रोजी प्रदर्शित होणार आहे