umbartha-2016




Umbartha 2016

उंबरठा २०१६
महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट एकांकिका स्पर्धेतील हक्काची आणि मानाची एकांकिका स्पर्धा म्हणजेच उंबरठा. ज्येष्ठ संगीतकार स्व. श्रीकांतजी ठाकरे ह्यांच्या स्मरणार्थ उत्कर्ष सेवा मंडळ आयोजित राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा Umbartha उंबरठा २०१६ वर्ष १४ वे .
यंदा ह्या स्पर्धेत ४५ एकांकिका सहभागी झाल्या असून प्रामुख्याने महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद, जळगाव आणि गोवा येथून हि संस्था सहभागी झाल्या आहेत.
अतिशय चुरशीची अशी लढत महाविद्यालय आणि हौशी संस्था ह्यांच्यात पाहण्यास मिळेल. Umbartha उंबरठा २०१६ प्राथमिक फेरीच परीक्षण करण्यासाठी सिने- नाट्य अभिनेत्री विमल म्हात्रे, सिने – नाट्य दिग्दर्शक व अभिनेता सुदेश
म्हशीलकर व रात्रीस खेळ चाले फेम व नाट्य लेखक प्रल्हाद कुडतरकर हे पाहणार आहेत
गेल्या १३ वर्षात ह्या स्पर्धेने महाराष्ट्रातील रंगकर्मींचा मनात हक्कच स्थान मिळवलं त्याच कारणही स्पष्ट आहे दर्जेदार आयोजन परीक्षक निवड ,
पारदर्शक निर्णय आणि मैत्रिपूर्ण वातावरण म्हणूनच  नवोदित कलाकारांना मिळत एक हक्कच व्यसपीठ. उंबरठा पार करून गेलेल्या प्रत्येक कलाकाराला पुढील त्याच्या नाट्यप्रवासाचे दालन उघडतेच आणि त्याची उदाहरण हि आहेत सध्याच्या मराठी वाहिनी वरील मालिकेत गाजत असलेले मयुरी देशमुख ,
प्रल्हाद कुडतरकर , मिहीर राजदा , अद्वैत दादरकर , प्रसाद खांडेकर, विनम्र भाबल. यंदाच्या उंबरठा २०१६ प्राथमिक फेरी दि ४,५ आणि ६ नोव्हें ला सेकंडरी हायस्कुल ना.म. जोशी मार्ग , डिलाईल रोड येथे तर शनिवार दि 17 डिसेम्बर २०१६ रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न होतील अशी माहिती श्री तुषार होडगे,कलाविभाग प्रमुख उत्कर्ष सेवा मंडळ यांनी दिली,
Umbartha 2016 Poster
umbartha-2016-natak
umbartha-2016-poster




umbartha-poster
umbartha-star-cast-poster
umbartha

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here