तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेचं नाव जरी घेतलं तरी अनेक रसिकप्रेक्षकांच्या चेहर्‍यावर हास्याच एक नकळत स्मित उमटून गेल्याशिवाय राहत नाही. अर्थातच त्या मालिकेने सर्वांच आजवर मनोरंजनच काहीशा अशा प्रकारे केलयं की, कितीतरी भन्नाट आठवणी या मालिकेने रसिकप्रेक्षकांच्या ह्रदयात कोरून ठेवल्या आहेत. तर आज आपण याच मालिकेतल्या एका खास विशिष्ट पात्राची भुमिका बजावणाऱ्या कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत.

हा कलाकार इतर कोणी नसून प्रचंड लोकप्रिय पात्र असलेल्या जेठालालचे वडील चंपकचाचा अर्थात बापूजींच पात्र साकारणारा कलाकार आहे. अमित भट हा अभिनेता जेठालालच्या वडीलांची भुमिका साकारतो आहे. अमीत भट याच्याविषयी अनेकांना आजवर अनेक बाबी माहित नाहीत. अर्थातचं त्याच आयुष्य फारच रॉयल आहे जे की सर्वांनाच माहीत पडल्यावर थक्क करून सोडतं.

अमित भट हा कलाकार त्याच्या मालिकेतील कामासाठी तब्बल प्रत्येक एका भागाच्या एपिसोडसाठी 80 हजार रूपये इतकं मानधन आकारत असल्याची माहिती आहे. तारक मेहतामधील चाचाजींची त्याची भुमिका रसिकप्रेक्षकांवर नेहमीच चांगली छाप उमटवून जात असल्याची पहायला मिळते. अनेकांकडून अमित भट याची नेहमीच त्याच्या कामाबद्दल तारीफ होत असते. अमित त्याच आयुष्य फार रॉयल जगत असल्याचीही माहिती मिळते.

त्याच्याकडे इनोव्हा, क्रिस्टा, टोयोटा यांसारख्या चांगल्या गाड्यादेखील आहेत. अमित भट याला आजवर रसिकप्रेक्षकांनी विविध कामांमधून पडद्यावर पाहिलं आहे. त्यांपैकी विशेष म्हणजे, “खिचडी”, “यस बॉस”, “चुपके चुपके”, “फनी फॅमिली डॉट कॉम” यांसारख्या मालिकांमधून तो रसिकप्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यांखेरीज अमितने सलमानच्या निर्मितीत बनलेल्या लव्हयात्री या सिनेमातही एक भुमिका साकारली होती.

खऱ्या आयुष्यातल्या गोष्टींवर नजर फिरवली तर लक्षात येईल की जेठालालच्या वडीलांची भुमिका बजावणारा अमित हा जेठालालपेक्षाही वयाने लहान आहे. आणि इतकचं नाही तर तो त्याच्या खऱ्या आयुष्यात अगदीच एक रोमॅन्टिक आणि बिनधास्तपणे जगणारा कलाकार आहे.

अर्थातच या साऱ्या गोष्टी तो निभावत असलेल्या पात्रापेक्षा विरोधाभास निर्माण करणाऱ्या बाबी आहेत. आपल्या पत्नीसोबत अमित कायम काही ना काही रोमॅन्टिक गोष्टी करत असल्याचं पहायला मिळतं. सोशल मीडियावर अमितचे त्याच्या पत्नीसोबत अनेक विविध पोजमधले फोटोज व्हायरलं झालेले पहायला मिळतात. अमितची पत्नी एखाद्या अभिनेत्रीपेक्षा दिसण्यात काहीच कमी नाहीये. तिचं नाव कृती हे आहे.

कृती आणि अमित दोघेही जणू एकमेकांसाठी बनलेले आहेत असेच पहायला मिळतात. अमित भट याला दोन जुळी मुलं आहेत ही बाब नक्कीच विशेष आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अमितच्या या दोन्ही मुलांनी तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत काम केलेलं आहे. या दोघांच्या कामाचा व्हिडिओदेखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरलं झालेला पहायला मिळाला होता.

मुळात खऱ्या अर्थानं गुजराती असलेल्या अमितनं बी. कॉम हे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मालिकांमधे छोटो मोठे अभिनय तो करत राहिला आणि एके दिवशी तारक मेहताच्या एका चांगल्या पात्राच्या भुमिकेनं त्याची ओळख पूर्णत: जगाला करून दिली. अमित भट याने गुजराती रंगभूमीची तब्बल 16 वर्षे सेवा केली आहे, एका कलाकाराच्या अंगभुत गुणांची खरी पारख ही रंगभूमीपासूनचं समजते. आणि ते सातत्यानं त्याच्या अभिनयातून रसिकप्रेक्षकांना आज रोज पहायला मिळतं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!