मित्रांनो! सध्या झी मराठी या लोकप्रिय वाहिनीवरील “देव माणूस” ही मालिका मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झालेली आहे. या मालिकेतील नवीन अपडेट रोजच येत असतात. सोशल मीडियावर ते सर्व दररोज शेअर होत असतात. याचे कारण म्हणजे या मालिकेचे रंजक आणि उत्कंठावर्धक कथानक. विशेष म्हणजे या मालिकेचे रिपीट टेलिकास्ट सुद्धा पाहिले जाते.
कारण या मालिकेतील उत्तम पात्र निवड त्यामुळेच या मालिकेतील डॉ. अजित कुमार देव, एसीपी दिव्या सिंह यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.मध्यंतरी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार , वैगेरे बातम्याही येऊन गेल्या परंतु , जसजसे दिवस जात आहेत तसतसे ही मालिका आता अधिकाधिक रंजक होतानाच दिसत आहे.
नवीन खबर अशी आहे की, आता या मालिकेमध्ये एक नवा चेहरा येणार आहे. हा नवा चेहरा तसे म्हणाल सोशल मीडियावर अतिशय सुप्रसिद्ध असाच आहे. जाणून घेऊ या…तुझ्यात जीव रंगला मालिकेत नंदिताची भूमिका साकारणारी अभिनेत्री माधुरी पवार ही आता देवमाणूस या मालिकेत दिसून येणार आहे.
येत्या एपिसोड्स मध्ये माधुरी प्रेक्षकांना दिसून येणार असून ती मालिकेत बार मालकीणच्या भूमिकेत दिसणार आहे. तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या शेवटच्या काही महिन्यात माधुरीने नंदिता वहिनीचे पात्र साकारले होते. माधुरी बद्दल सांगायचे झाले तर 21 मार्च 1993 रोजी खान्देशातील शिरपूर येथे माधुरी पवारचा जन्म झाला.
राजे शिवाजी विद्यालय नंदुरबार येथे तीने तिचे शालेय शिक्षण पूर्ण केलेले असून तिने नंतर शहादा येथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच डिप्लोमा देखील केलेला आहे. माधुरीच्या कला प्रवासाबद्दल जाणून घ्यायचे झाल्यास सर्वप्रथम ती अप्सरा आली या झी युवा वरील लोकप्रिय टीव्ही डान्स शो मध्ये झळकली होती.
आपल्या हातखंडा असलेल्या लावणी या नृत्यप्रकाराचे विविध कलाविष्कार दाखवून आणि आपल्या मादक आणि दिलखेचक अदांनी, रसिक प्रेक्षक आणि सन्माननीय परिक्षकांना मंत्रमुग्ध करून तिने सर्वांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले आणि आपल्या या विशेष कलागुणांच्या जोरावर ती या नामांकित शो ची विजेती ठरली होती.
माधुरी सोशल मीडियावर तिच्या डान्स मुळे जास्त प्रसिद्धीझोतात असते. ती युट्युब आणि टिक टॉक वर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय होती. त्याचप्रमाणे इंस्टाग्राम वर देखील ती ऍक्टिव्ह असते. या सर्व माध्यमावर तिचे लाखो चाहते आहेत. आता देवमाणूस मालिकेत तिच्या येण्यामुळे काय ट्विस्ट येणार हे पाहणे मात्र नक्कीच मनोरंजक ठरेल.