सध्या एका मालिकेचा प्रोमो गाजत होता. आता तर मालिका ही सूरु झाली आहे. आणि फार लोकप्रिय झाली आहे. त्यातील सर्वच कलाकार खूप छान अभिनय करतात. त्यात म्हणजे तो रघु तर खूपच भारी. त्याची काम करण्याची पद्धत खूप भारी आहे. स्टाईल खूप चांगली आहे. वेगळं पण हेच त्याला मोठं करत आहे. आज आपण त्याच्या बद्दल जाणुन घेणार आहोत की तो नेमकं या क्षेत्रात आला कसा ? चला तर मग सविस्तर जाणून घेऊयात.

तुझ्या इश्काचा नादखुळा’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळते. या मालिकेत रघू ही भूमिका साकारणाऱ्या संचित चौधरीचा अभिनयाचा प्रवास खरोखर थक्क करणारा आहे.

संचित मुळचा नागपूरचा. त्याचं सारं बालपण नागपूर मध्येच गेलेलं. त्याची कर्मभूमी म्हणलं तरी हरकत नाही. त्याने आज नागपूर चं नाव खूप मोठं केलेलं आहे. कारण तो सध्या इंडस्ट्रीत रघु म्हणून लोकप्रिय झाला आहे.

वडिल शिक्षक असल्यामुळे संचितनेही शिक्षक व्हावं अशी त्यांची इच्छा होती. ते घरचं सर्वांचं सारखं असतं. त्याला अभिनय न करण्याचा असा घरून खूप वि’रो’ध होता पण ती काय मागे हटला नाही.

संचितने सायकॉलॉजीमध्ये एम ए केलं आणि दोन वर्ष प्रोफेसर म्हणून सरकारी शाळेत नोकरीही केली. नोकरी ठरत असताना मात्र त्याला अभिनय महत्वाचा वाटू लागला. वाटलं आपण अभिनय सोडून काही मोठी चूक तर नाही करत ना.

संचितला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. कारण अभिनय त्याचा जीव की प्राण होता. शेवटी त्याने त्यातच मोठं होण्याचं ठरवलं. टीव्हीवरचे कॉमेडी शोज पाहून तो स्क्रीप्ट लिहायचा आणि शाळेत परफॉर्म करायचा.

दहावीनंतर मात्र त्याला काही स्पर्धांविषयी कळलं. मग त्याने नागपूरातला रंगरसिया थिएटर ग्रुप जॉईन केला.मुंबईत पृथ्वी थिएटरमध्ये त्याने बरेच प्ले सादर केले. बरेच वर्कशॉप्सही तो घेत होतो.हिंदी आणि मराठीसाठी डबिंग आर्टिस्ट म्हणूनही त्याने काम केलं. नोकरी करता करता हे सर्व चालू होतं.

अभिनय क्षेत्राची आवड असलेल्या संचितला नोकरीत काहीच रस नव्हता.त्यामुळे सरकारी नोकरी सोडून त्याने पूर्णपणे अभिनय करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला घरातून विरोध झाला मात्र त्याच्या हट्टापायी वडिलांनीही साथ दिली. आणि आता तो यशाच्या शिखरावर आहे. आता वडील सुद्धा त्याला सपोर्ट करतात. कारण मुलगा स्टार झाला आहे.

स्टार प्रवाहवरील प्रेमाचा गेम सेम टू सेम मालिकेत दुहेरी व्यक्तिरेखा साकारल्यानंतर आता संचित तुझ्या इश्काचा नादखुळा या मालिकेत रघूच्या भूमिकेत दिसत आहे. रघु साकारून त्याने आता इंडस्ट्रीत वेगळी झेप घेतली आहे. त्यासाठी त्याला खूप साऱ्या शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.