सध्या सोशल मीडियाच्या जमान्यात अनेक नवीन प्लॅटफॉर्म्स सुरु झाले तर काही बंद झाले. भारतीय गव्हर्नमेन्ट ने ‘बॅन’ करण्याआधी गेल्यावर्षीपर्यंत ‘टिक टॉक’ हा प्लॅटफॉर्म तरुणाईमध्ये प्रचंड प्रसिद्ध होता. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेक तरुण तरुणी आपल्यातील कलागुणांसकट येथे व्यक्त होत होते. या प्लॅटफॉर्मची महती एव्हडी वाढली की या प्लॅटफॉर्मवरसुद्धा ‘स्टार्स’ बनू लागले ज्यांना ‘टिक टॉक स्टार्स’ ही ‘पदवी’ मिळाली. यातील अनेक जण म्युझिक व्हिडीओजमध्ये दिसू लागले तर कांहींनीं तर चित्रपटसृष्टीत पाय ठेवला. अशीच एक मराठमोळी टिक टॉक स्टार आहे रुची कदम जी मनोरंजनसृष्टीत पदार्पण करण्यास तयार झालीय.

रुची कदम चे टिक टॉक वर दशलक्षापेक्षा अधिक फॉलोअर्स होते आणि आता ती दुसऱ्या भारतीय ‘शॉर्ट व्हिडीओ’ प्लॅटफॉर्मवर तितकीच प्रसिद्ध आहे आणि तिच्या छोट्या छोट्या व्हिडीओ पोस्ट्सना खूपच पाठिंबा मिळत असतो. तर ही मराठमोळी रुची कदम आता झळकणार आहे एक म्युझिक व्हिडीओमध्ये. सर्वस्व एंटरटेन्मेन्ट च्या बॅनरखाली ‘सपान लागलं’ हा म्युझिक व्हिडीओ बाजारात येत असून यात रुचीची ‘डॉक्टर डॉक्टर’ फेम ओंकार परदेशी सोबत रोमँटिक जोडी बनली आहे. या गाण्यात ज्ञानेश्वरी गायकवाड सुद्धा झळकणार आहे. हे गाणे गायलेय सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड हिने. तिला गाण्यात साथ दिली आहे आदर्श शिंदे व ओंकार परदेशी यांनी व संगीत दिलंय अनिल काकडे यांनी.

सोशल मीडिया स्टार रुची कदम चा पदर्पणीय म्युझिक व्हिडीओ ‘सपान लागलं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.