मित्रांनो! मराठी मनोरंजन विश्वात कायमच वादग्रस्त म्हणून प्रसिद्ध आणि चर्चित असलेली अभिनेत्री केतकी चितळे नेहमीच आपल्या बेधक आणि बेताल वक्तव्यांमुळे प्रकाशझोतात असते. सतत सोशल मीडियावर व्यक्त होणारी ही अभिनेत्री आता मात्र एका मोठ्या प्रकरणात कायदेशीररित्या अडकली आहे. आता मात्र केतकी चितळेला ‘ती’ पोस्ट आणखी भोवणार! ठाणे कोर्टाकडून अभिनेत्रीचा अटकपूर्व जामीन नामंजूर, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

केतकी चितळे ही सर्वदाच आपल्या बेधडक आणि बेताल वक्तव्यांमुळे प्रकाशझोतात असते. सतत सोशल मीडियावर व्यक्त होणारी ही अभिनेत्री आता मात्र एका मोठ्या प्रकरणात कायदेशीर रित्या अडकली आहे. या प्रकरणात आता ठाणे कोर्टाने देखील तिचा अटकपूर्व जामीन नाकारला आहे. हे प्रकरण साधारण वर्षभरापूर्वीचे असले तरी आता अभिनेत्रीवर अटकेची टांगती तलवार आहे. केतकी चितळे सतत काहीना काही प्रकरणांवरून चर्चेत असते. ती आपली मतं सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून मांडत असते. अभिनेत्री अनेकदा या मुळे ट्रोल देखील होत असते. तर, अनेकदा तिला सोशल मीडियाद्वारे धमक्या देखील मिळतात.

गतवर्षी दलित समाजाबद्दल अशीच काही आक्षेपार्ह पोस्ट करत केतकीने नवा वाद ओढवून घेतला होता, जो आता तिला चांगलाच महागात पडणार आहे. काय होत ते प्रकरण? चला जाणून घेऊ या. अभिनेत्री केतकी चितळेने १ मार्च २०२० रोजी रात्री फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती. यात तिने “नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू, असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,” असे लिहिले होते.

या फेसबुक पोस्टवरुन तिला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले होते. तसेच या फेसबुक पोस्टमधील नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क, या वाक्यावर काही आंबेडकर विचारवादी नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. या लिखाणावरुन त्यांचा नवबौद्ध समाजाबद्दल त्यांच्या पानातील द्वेष समोर येतो. आम्ही त्यांच्या या लिखाणाचा जाहीर निषेध करतो. तसेच त्यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी आंबेडकर विचारवादी नेत्यांनी केली.

अभिनेत्री केतकी चितळे हिची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर तिच्या विरोधात रबाळे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवी मुंबईतील आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते वकील स्वप्नील जगताप यांनी ही तक्रार पोलीस स्थानकात दाखल केली होती. त्याच्या तक्रारीनुसार अभिनेत्रीवर अॅट्रोसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी आता ठाणे कोर्टाने अभिनेत्री केतकी चितळे हिचा अटकपूर्व जमीन अर्ज फेटाळल्याने आता तिच्यावर अटकेची टांगती तलवार आहे.