ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

बँड बाजा वरात या एकदम नवीन आणि मराठमोळ्या कार्यक्रमाने अनेक नवविवाहित जोडप्यांना प्रेमाचा आहेर देऊन त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा दिवस आणखीनच खास बनवण्यात आपला मोलाचं वाटा बजावला आहे.

आणि आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री श्वेता शिंदे आणि तिचा पती संदीप भन्साळी हे दोघेही सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत येत आहेत. झी मराठी वाहिनी नेहमीच वेगवेगळे मजेशीर आणि मनोरंजक कार्यक्रम सादर करून प्रेक्षकांचे अनेक प्रकारे मनोरंजन करत असते.

श्वेता नुकतीच झी मराठीवरील ‘बँड बाजा वरात’ या शोमध्ये झळकताना दिसून आली होती. हा कार्यक्रम नेहमीच नवविवाहित जोडप्यांना आहेर देऊन त्यांच्या आयुष्यातील या सर्वात महत्वाचे दिवस आणखी खास बनवत आहे.

‘बँड बाजा वरात’ कार्यक्रमात श्वेता आणि संदीपचा विवाहसोहळा पार पडल्याचे प्रेक्षकांना पाहायला मिळाले या लग्नात श्वेता-संदीप मराठमोळ्या पोशाखात सजलेले दिसून आले आहेत. श्वेताने तिच्या ह्या लग्नसोहळ्याचे इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.

ब्राइडल लूकमध्ये श्वेता खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये श्वेताने पर्पल कलरची सुंदर साडी घातली आहे. श्वेता-संदीपने २००७ मध्ये लग्न केले होते. संदीपने अनेक यशस्वी हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. संदीप सध्या अभिनयापासून दूर असून त्याचा स्वतःचा कपड्यांचा व्यवसाय आहे. अभिनेत्री असण्यासोबतच श्वेता एक उत्तम निर्माती देखील आहे.