मराठी सिनेसृष्टीत कधी काय होईल हे बऱ्याच वेळा अनिश्चितच असतं असं म्हणावं लागेल. मराठी सिनेसृष्टीला अनेकदा मालिकेच्या प्रसिद्धीव्यतिरिक्तही पैशांचा बऱ्यापैकी तुटवडा सहण करावा लागतो, अथवा थोडक्यात म्हणालं तर इतरही बऱ्याच अडचणी मराठी सिनेसृष्टीत सध्याच्या घडीला निर्माण होताना पहायला मिळत आहेत. आणि यांवरून बरेच कलाकार त्यांच्या चांगल्याचांगल्या भुमिकांच्या मालिका डावलत असताना पहायला मिळत आहेत.

आणि म्हणूनच कदाचित असं म्हणावं लागेल की, मालिकांमधल्या भुमिका अचानक मध्यावरच सोडून निघून जाणं हे कलाकारांसाठी फार काही अवघड काम नाही. अभिनेते- अभिनेत्र्या सध्यातरी असं अगदी सहजरित्या करून जातात. मग त्यांच्या मालिकेची वा त्यांच्या पात्राची प्रसिद्धी कितीही प्रमाणात जरी चांगली झालेली असो. कधीकधी काही कलाकारांना मालिकेतून काढूनदेखील टाकण्यात येतं.

मुळात आज आपण अशा कलाकारांविषयी माहिती पाहणार आहोत ज्यांनी चालू मालिकेतून मधेच काढता पाय काढत मालिकांमधून माघार घेतली आहे. यापैकी पहिली व्यक्ती म्हणजे वीणा जगताप. वीणा जगताप या नावाशी तुम्ही बिग बॉसच्या घरापासून परिचित आहातचं. तर तिने आई माझी काळूबाई या मालिकेला मधेच रामराम ठोकला आहे. यासाठी तिने तिचं वैयक्तिक कारण पुढे करत सारवासारव केली असून तिच्या जागी आता मराठी सिनेअभिनेत्री रश्मी अनपट ही तिची भुमिका साकारणार आहे.

प्राजक्ता गायकवाड हिनेदेखील आई माझी काळूबाई हीच मालिका अर्ध्यावर सोडून दिली आहे. ती या मालिकेत काम करत असताना एका वादाचा प्रसंग निर्माण झाल्याने तीने हि मालिका सोडणं पसंत केल्याचं समजतं आहे.

यानंतर ज्या अभिनेत्रीने अर्धावर मालिका सोडायचा निर्णय घेतला ती म्हणजे, किरण ढाणे. लागीर झालं जी या मालिकेत जयडीची भुमिका साकारणाऱ्या किरण हिने हीच मालिका अर्ध्यावर सोडली होती. तिने निर्मात्यांकडे मानधन वाढवण्याची मागणी केली होती परंतु ती अमान्य करण्यात आल्याने तिने पुढे हि मालिका सोडण्याचा निर्णय घेऊन टाकला.

यानंतर येते ती अभिनेत्री म्हणजे ईशा केसकर. ईशानेदेखील माझ्या नवर्‍याची बायको या मालिकेतून माघार घेतली होती. विशेष म्हणजे जेव्हा तिचं शनाया हे पात्र प्रचंड गाजत होतं अशा वेळी तिने मालिका सोडणं प्रेक्षकांना आवडलं नव्हतं.

यानंतर येतात ते कलाकार म्हणजे संजय मोने. संजय मोने त्यांच्या मिश्किलीच्या शैलीमुळे खास ओळखले जातात. त्यांनीदेखील “राधा प्रेमरंगी रंगली” या मालिकेला सुरूवातीचं संगीत आणि तेवढाच व्हिडिओचा भाग करून ही मालिका सोडून दिली होती. त्यांच्याकडून याच्यावर अद्यापही कुठलं स्पष्टिकरण आजवर भेटलेलं नाही.

यानंतर येते शिवानी सुर्वे. शिवानीलादेखील तुम्ही बिग बॉसच्या घरात याआधी पाहिलं आहे. त्याहीपेक्षा आधी म्हटलं तर ती देवयानी मालिकेचा प्राणचं होती. मुख्य भुमिकेत असलेल्या शिवानीने त्या काळात प्रचंड गाजत असलेली ही मालिका मधेच सोडली होती. तिच्या बाबतीत या मालिकेच्या निर्मात्यांसोबत तिची वादावादी झाल्याची माहिती मिळते.

आता येते ती अभिनेत्री म्हणजे रसिका सुनील. रसिकाने माझ्या नवर्‍याची बायको या मालिकेतून सुरूवातीची शनाया साकारली होती परंतु तिने मालिका सोडली आणि पुन्हा तिथे ईशा केसकरची एन्ट्री झाली होती. अधुन-मधुन रसिकाने अशा एकदोन मालिकाही सोडल्या आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!