या कलाकारांच्या आवाजात आहे जादू, केवळ अभिनय नाही तर गायनामुळेही आहेत प्रसिद्ध!

हिंदी सिनेसृष्टीत आजवर असे अनेक कलाकार आपल्याला पहायला मिळतात जे की एकाच प्रकारच्या भुमिका न निभावता इतरही बऱ्याच भुमिका पार पाडतात. जसं की, दिग्दर्शन, अभिनय, कोरीओग्राफी किंवा लेखन, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी असं काहीसं. परंतु हिंदी सिनेसृष्टीत असेही कलाकार आहेत जे केवळ त्यांच्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहेत असं नाही तर त्यांच्या गायनाच्या आवाजामुळेही त्यांची वेगळी ओळख बनलेली पहायला मिळते. काही कलाकार आपल्यातील इतर कलाही अनेकदा रसिकप्रेक्षकांसमोर मांडत असतात तर अनेकांना संधी मिळेल तेव्हा ते आपला इतर पैलू रसिकप्रेक्षकांच्या समोर बखुबीने मांडतात. तर आज आपण अशा काही कलाकारांबद्दल जाणून घेणार आहोत जे कलाकार असण्यासोबतच उत्तम गायकदेखील आहेत. चला तर मग आपण जाणून घेऊयात कोण आहेत हे कलाकार?

सर्वप्रथम नाव घ्यायचं म्हटलं तर आयुषमान खुराना. गायनाच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर या अभिनेत्याचा हात भलेभले गायकही धरू शकणार नाहीत अशी याची गायिकी आहे. आयुषमानने आजवर अनेक गाणे हिंदी सिनेसृष्टीत गायले आहेत. त्याचे अल्बम्स प्रचंड हिट आणि लोकप्रियदेखील ठरलेले आहेत. मुळात जमेची बाजू म्हणजे आयुषमानचे सिनेमे कायमच प्रचंड हिटदेखील ठरतात. आयुषमान आजच्या पिढीचा एकप्रकारे आयकॉन आहे.

यानंतर येणारी एक अभिनेत्री म्हटलं तर ती आहे प्रियंका चोपरा. हो नाव तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे. सध्याच्या घडीला ग्लोबल स्टार झालेली प्रियंका चोपराचे अल्बमदेखील रिलीज झालेले आणि हिटदेखील झालेले पहायला मिळतात. प्रियंकाने इंग्रजी गाण्यांव्यतिरिक्त हिंदी सिनेसृष्टीतही काही गाणी गायली आहेत. तिच्या अभिनयाच्या कौशल्याप्रमाणेच तिच्या आवाजातही चांगलीच लकब असलेली पहायला मिळते.

यानंतर येणाऱ्या कलाकाराबद्दल बोलायचं म्हटलं तर ती एक अभिनेत्रीच आहे. अर्थात आलिया भट. आलिया भट जरी आधीपासूनच एक स्टारकिड म्हणून सिनेसृष्टीत आलेली असली तरीदेखील तिने विविध स्वरूपाच्या चॅलेंजिंग भुमिका साकारून स्वत:ला सिद्द केल्याच आपण सर्वांनीच पाहिलं आहे. याशिवाय आलियाने चक्क तिच्या गायनातूनही सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. “हम्प्टी शर्मा की दुल्हनिया” सिनेमात तिने फिमेल व्हर्जन गाणं गायलं आहे, याखेरीज “इक कुडी” हेदेखील गाणं तिनं बखुबी उत्तम गायल्याच पहायला मिळतं. हायवे सिनेमाकरताही तिने गाणं गायलं आहे. आलिया तिच्या कलाकारीच्या अदांशिवाय तिच्या गायनामुळेही प्रसिद्ध आहे.

यानंतर येणारा कलाकार म्हणजे, फरहान अख्तर. फरहान अख्तर याने आजवर अभिनेता-दिग्दर्शक म्हणून तर काम केल्याच पहायला मिळालचं होतं परंतु त्याशिवायही महत्वाचं म्हणजे, स्वत:च्या अनेक सिनेमांना त्याने स्वत:ची गायकी आजमावत आपला आवाज दिला आहे. सिनेसृष्टीत सिनेमांमधे म्युझिकल प्रवासाची सुरुवात “रॉक ऑन” या सिनेमातून झाली होती. याच सिनेमात अभिनयासोबतच फरहानने गायनदेखील केलं होतं.

यानंतर येणारी गायिका अभिनेत्री म्हणजे परिणिती चोपरा. परिणितीची प्राथमिक ओळख जरी प्रियंकाची बहिण म्हणून असली तरी त्यापलीकडेही जाऊन आपल्या अभिनयातील कौशल्यांची प्रचिती परिणितीने साऱ्या जगाला दिली, एवढ्यावरच ती थांबली नाही तर तिने गायन करूनदेखील सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. तिच्या आवाजातला मधुरपणा पाहून अनेकांना हैराणी झालेली पहायला मिळाली होती. “माना के हम यार नहीं”, “तेरी मिट्टी” यांसारख्या गाण्यांनाही तिने आवाज दिलेला पहायला मिळतो. परिणितीने गायनाचं शिक्षण घेतलेलं आहे. ती आधीपासूनच एक ट्रेन झालेली गायिका आहे. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!