या अभिनेत्रींनी नायक सोडून चक्क खलनायकांसोबत बांधली लग्नगाठ, पहा या बॉलीवुडच्या जबरदस्त जोड्या!

हिंदी सिनेसृष्टीत नायक असो वा खलनायक असो वा एखादा सहकलाकाराची भुमिका बजावणारा कलाकार असो अगदी सारेकाही कथानकाच्या गरजेनुसार आणि सिनेमाच्या प्राथमिकतेनुसार गरजेचे पैलू असतात. परंतु बऱ्याचदा आपण सहसा असं पाहतो की, एखादी नटी अथवा एखादा कुणीही व्यक्ती असेल तर तो सिनेमाच्या खलनायकासोबत अथवा खलनायिकेसोबत फारसं नातं जुळवायच्या भानगडीत पडत नाही. परंतु काही अभिनेत्री तर अशा आहेत ज्यांनी थेट खलनायकाशी लग्नाची गाठचं बांधली आहे. या काही ठराविक अभिनेत्रींनी फारसा विचार न करता अगदी निर्धास्तपणे खलनायकांना आपल्या जीवणाचा महत्त्वाचा भाग बनवलं आहे. तर या अशाच खास अभिनेत्रींबद्दल आपण इथे जाणून घेणार आहोत. चला तर मग पाहुयात कोणत्या अभिनेत्रींनी खलनायकात आपल्या आयुष्याचा नायक पाहिला आहे.

पहिली जोडी म्हणजे, आशुतोष राणा आणि रेनुका शहाणे. हम आपके है कौन या जबरदस्त हिट सिनेमातली अभिनेत्री असलेली रेनुका शहाणे, हिने चक्क हिंदी सिनेसृष्टीतला आजवर भन्नाट खलनायक साकारत आलेल्या आशुतोष राणा याच्यासोबत आपली लग्नगाठ बांधली आहे. साधारणतः २००१ सालात दोघेही विवाहबंधनात अडकले. आशुतोषच्या खलनायकांच्या खास भुमिका या संघर्ष, बादल, दुश्मन यांसारख्या सिनेमांमधून लक्षात राहतात. अभिनेत्री रेनुका शहाणे हि मराठी सिनेसृष्टीत आज काहीवेळा काही रिॲलिटी शोमध्ये सहभागी होत असल्याची पहायला मिळते.

यानंतर येणारी जोडी म्हणजे, पुजा बत्रा आणि नवाब शाह. नव्वदीच्या दशकातली सर्वाधिक लोकप्रिय आणि कायम आपल्या सौंदर्याने रसिकप्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री म्हणून पुजा बत्राला सर्वजण आज ओळखतात. पुजा बत्राने खलनायक भुमिका साकारलेल्या नवाब शाह याच्यासोबत काही दिवस रिलेशनशीपमधे राहून नंतर त्याच्याशी लग्न करण्याचा निर्णय जाहिर केला होता. आज ही जोडी अगदी खुशाल आणि फार सुंदररित्या आपलं आयुष्य जगताना पहायला मिळते. अनेकदा ही जोडी एकमेकांसोबत फोटोशुटदेखील करतात, जे सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतात. नवाब शाह याने टायगर जिंदा है, डॉन २ याशिवाय अनेक दाक्षिणात्य सिनेमांमधे खलनायकाच्या भुमिका साकारल्या आहेत.

यानंतर येणारी जोडी म्हणजे पोनी शर्मा आणि खलनायक अभिनेते प्रकाश राज. हिंदी सिनेसृष्टी असो वा दाक्षिणात्य सिनेमा सर्वत्र जर एखाद्या खलनायकाची जगजाहीर तारीफ केल्या जात असेल तर ते म्हणजे प्रकाश राज. त्यांच्या खलनायकाच्या भुमिकांचा साज रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करून जातो. पोनी वर्मा ही एक कोरीओग्राफर आहे. आणि या कोरीओग्राफरने आपला जोडीदार एक खलनायक स्विकारला आहे. २०१० सालात दोघे विवाहबंधनात अडकल्याचे पहायला मिळाले होते. सिंघम, वॉंटेड, दबंग २ यांसारख्या हिंदी सिनेमातून प्रकाश राज यांनी आपल्या खलनायक भुमिकांची छाप उमटवली आहे. आजच्या घडीला पोनी वर्मा आणि प्रकाश राज हे अगदी आनंदात एकत्र आयुष्य जगत असल्याचं पहायला मिळतं.

यानंतर येते ती जोडी म्हणजे निवेदिता भट्टाचार्य आणि के के मेनन. के के मेनन हे मराठी सिनेसृष्टीतली काम करतात. शिवाय अनेक हिंदी सिनेमांमधे ते खलनायकाच्या भुमिकेत पहायला मिळतात. त्यांच्यासोबत अभिनेत्री निवेदिता भट्टाचार्य हिने लग्नाची रेशीमगाठ बांधली आहे.

यानंतर येणारी जोडी म्हणालं तर ती आहे अभिनेत्री कृतिका सेंगर आणि खलनायक भुमिका साकारणारा निकीतन धीर यांची. छोट्या पडद्यावर राणी लक्ष्मीबाई मधील झाशीच्या राणीची भुमिका करून ती गाजवलेल्या आणि कसम तेरे प्यार की मधूनही बखुबी छाप रसिकप्रेक्षकांवर उमटवलेल्या अभिनेत्री कृतिकाने चक्क खलनायक भुमिका साकारणाऱ्या निकितन याला आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून निवडलं. २०१४ सालात दोघेही विवाहबंधनात अडकले होते. चेन्नई एक्स्प्रेस, मिशन इस्तंबूल, दबंग २, रेडी, यांसारख्या अनेक सिनेमांमधून खलनायकाच्या स्वरूपातील भुमिका निभावल्या आहेत.

शक्ती कपूर यांच्याबद्दल काही सांगायच म्हटलं तर काही गोष्टी नक्कीच कमी पडतील. शक्ती कपूर यांची पत्नी शिवांगी कोल्हापुरे यांनी त्या काळातल्या एवढ्या भन्नाट स्वरूपातल्या खलनायक असलेल्या शक्ती जी यांच्यासोबत लग्नाच्या गाठी बांधल्या हे विशेषच. शक्ती कपूर यांनी केवळ खलनायकच नाही तर अनेकदा विनोदी भुमिकाही साकारल्या आहेत. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!