बॉलिवुडमधील या अभिनेत्रींच्या अंगावर आहेत भन्नाट टॅटू, या टॅटूमुळे अभिनेत्रीला तर वादाला सामोरं जावे लागले होते!

हिंदी सिनेसृष्टीत आजवर अनेक कलाकार त्यांच्या विविध फॅशन, स्टाईल आणि इतर विविध प्रकारच्या अनेक गोष्टींमुळे चर्चेत राहत असतात. या कलाकारांनी त्यांच्या लॅव्हिश जगण्याला एक वेगळ्याच प्रकारच्या पातळीवर आज नेऊन ठेवल्याच आपल्याला पहायला मिळतं. तर मुळात आज आपण अशा गोष्टींबद्दल पाहणार आहोत ज्यामुळे काही अभिनेत्रींनी काही खास फॅशनला स्वत:वर आजमावून पाहिलं आहे. चला तर मग मुळात त्या गोष्टींना जरा जवळून व्यवस्थितरित्या पाहुयात. तर ही गोष्ट आहे टॅटूबद्दलची. टॅटू हा तशी पुरातन काळापासून चालत आलेली गोष्ट आहे. पुरातन काळात लोक त्यांच्या ओळखीसाठी खास टॅटूंचा वापर करत असायचे. पण आजच्या काळात ओळख ही प्राथमिकता संपून टॅटू म्हणजे फॅशन आणि स्टाईल झाली आहे. टॅटू काढणं म्हणजे आजच्या घडीला कुल समजलं जातं. आणि आज बरेचशे सिनेकलाकार, क्रिकेटर्स, फुटबॉल प्लेयर्स, गायक हे सारेच काही ना काही टॅटू आपल्या शरिरावर बनवत असल्याचे पहायला मिळतात. आजच्या काळात आपल्या शरीरावर टॅटू काढणं फारच सुंदर लक्षणदेखील अनेकांकडून मानल्या जातं. या दिवसांमधे एखादा व्यक्ती जरा बऱ्यापैकी प्रसिद्धीझोतात आला तरी त्याला टॅटू काढायची हौस लागते. मग अशात बॉलीवुडमधील अभिनेत्री मागे कशा राहतील? चला तर मग आज आपण अशा काही अभिनेत्रींबद्दल आता जाणून घेऊयात ज्यांनी विविध प्रकारच्या टॅटूंना आपल्या शरिरावर गोंदवून घेतलं आहे. तर या अभिनेत्रींच्या लिस्टमधे पहिलं नाव जर कोणाच शामिल होत असेल तर ते आहे आलिया भट या अभिनेत्रीचं. आलियाने तिच्या केसांच्या पाठोपाठ मानेवर एक टॅटू गोंदवून घेतला होता. तिच्या या टॅटूवर “पटाका” हे लिहिलेलं दिसायला मिळत होतं. “हम्प्टी शर्मा की दुल्हनिया” या सिनेमाच्या शुटींगदरम्यान तिने हा टॅटू गोंदवला होता.

आलिया भट हिच्या नंतर बोलायचं म्हटलं तर जी अभिनेत्री येते तिचं नाव म्हणजेच प्रियंका चोपरा. प्रियंका आज हॉलीवुडमधे स्थायिक झाल्याची पहायला मिळते आहे. बॉलीवुडमधे देसी गर्ल ही छबी कमावणाऱ्या प्रियंकाच्या हातावर एक टॅटू काढलेला पहायला मिळतो. “डॅडिज लिटल गर्ल” या शब्दांचा हा रेखीव टॅटू असलेला पहायला मिळतो. प्रियंका चोपरा कायमच तिच्या वडिलांची लाडकी राहिलेली आहे. शिवाय प्रियंकाच तिच्या वडिलांवरच प्रेम कायमच वारंवार दिसून येतं.

सध्या बॉलीवुडमधील सिनेसृष्टीत टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली अभिनेत्री म्हणजे दिपीका पादुकोन. दिपीका पादुकोन ही हिंदी चित्रपटांमधे सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. दिपीकाने नुकतच काही दिवसांपूर्वी अभिनेता रणवीर सिंह याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. खरतरं टॅटूमुळे दिपीका जरा वादात अडकली होती कारण आपला जुना बॉयफ्रेंड असलेल्या रणबीर कपूरचा शॉर्ट फॉर्म “आर के” हा तिच्या टॅटूत गोंदलेला पहायला मिळाला होता. दिपिकाने तिच्या मानेवर हा टॅटू कोरला होता, तिने आजच्या घडीला तो टॅटू हटवला आहे. परंतू अगदी तसाच टॅटू तिच्या पायावर अजूनही आहे.

यानंतर येते ती अभिनेत्री म्हणजे कृती सेनन. कृतीने तिच्या पाठीवर “के” अक्षर टॅटूमधे कोरलेलं पहायला मिळतं. कृती सेनन हिने एकदा तिच्या या टॅटूचा फोटो इन्स्टाग्रामवर तिच्या चाहत्यांसोबत शेअर केलेला पहायला मिळाला होता. कृतीच्या या टॅटूमुळे अनेकांनी आपापल्या पद्धतीने तर्क वितर्क लावल्याचे पहायला मिळतं होते.

आता येते ती सर्वात शेवटची अभिनेत्री म्हणजे, मलाईका अरोरा. मलाईका अरोरा तिच्या सिनेसृष्टीतल्या कामाव्यतिरिक्त खाजगी आयुष्यातील घडामोडींमुळे सध्या अधिक प्रमाणात चर्चेत राहत असल्याची पहायला मिळते. शिवाय बॉलीवुडमधे स्वत:च्या सेक्सी लुक्सनेदेखील अनेकांची स्वत:कडे मन वळवणारी अभिनेत्री म्हणजे मलाईका अरोरा. मलाईकाने तिच्या हातावर आणि पाठीवरदेखील अनेक टॅटू गोंदवले आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!