बॉलिवुडमधील या अभिनेत्री बनल्या आहेत सावत्र आई, ही अभिनेत्री तर चार मुलांची झाली सावत्र आई!

हिंदी सिनेसृष्टीत अर्थात बॉलीवुडमधे आज आपण अनेक विविधांगी गोष्टी प्रखर्शाने पाहत असतो. अशातच एक अनोखी बात म्हणजे, इथे एकतर इतकी प्रेमप्रकरणे घडतात, बिघडतात आणि अशातच काही बाबतीत तर चक्क लग्नासारख्या गंभीर गोष्टीचही इथे गांभीर्य कुणाला दिसल्याचं जाणवत नाही. बॉलीवुडमधे घटस्फोटही निर्विवादपणे होतात तेव्हा इथपर्यंत ठीक होतं असं विचारात यायचं. परंतु एक पाऊल अधीक पुढे म्हटलं तर काही ठराविक अभिनेत्रींनी त्यांच्या सावत्रपणाच्या नात्याचा अगदी सहज स्विकार केल्याचा पहायला मिळतो. आणि या अभिनेत्री खऱ्या आयुष्यात चक्क सावत्र आईच्या भूमिकेत हल्ली पहायला मिळतात. तर आज आपण अशा काही अभिनेत्रींबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या सावत्र आई म्हणून बॉलीवुडमधे हल्ली परिचीत आहेत.

सर्वात प्रथम म्हणालं तर ती अभिनेत्री म्हणजे, दिया मिर्झा. दिया मिर्झा ही बॉलीवुडची सर्वाधिक ग्लॅमरस आणि प्रचंड सौंदर्याच्या बाबतीत आघाडीची अभिनेत्री आहे, जी नुकतीच सावत्र आई झाली आहे. वैभव रेखी या बिझनेसमॅन सोबत तिने लग्न केलं आहे. वैभव रेखी हा आधीच एका मुलीचा बाप आहे. वैभव रेखीचं आणि दिया मिर्झा या दोघांचही हे दुसरं लग्न आहे. लग्नाच्या वेळी आपल्या सावत्र आईच सर्वात पहिले स्वागत वैभव रेखीची मुलगी समायरा हिनेच केलं होतं, समायरा आणि दियाची बॉन्डींग अगदी चांगली असल्याचंही समजून येतं आहे. दिया मिर्झा आणि तिचा पती गेल्या काही दिवसांपासून मालदीवमधे सुट्याही घालवत असल्याचे पहायला मिळाले होते.

यानंतर येणारी व्यक्ती म्हटलं तर ती आहे बॉलिवुडमधील अदाकारीची क्वीन करीना कपूर. करीना कपूरने आधीच दोन मुलांचा बाप असलेला अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत लग्न केलेलं आहे. करीना सारा आणि इब्राहिम यांची सावत्र आई झालेली आहे. करीना आणि सारा वा इब्राहिम यांच्यात फारसा लगाव असल्याच कधीही दिसून आलेलं नाही. सारा आणि इब्राहिम दोघेही आपली आई अमृता सोबत राहणं अधीक पसंत करत असल्याच बऱ्याचदा पहायला मिळतं. करीना कपूरने नुकताच दुसऱ्या बाळाला जन्म दिलेला आहे.

शिल्पा शेट्टी हे नाव जर घेतलं तर थोडसं आश्चर्यचकीत वाटू शकतं. कारण शिल्पादेखील सावत्र आई आहे, हे आज अनेकांना ठाऊकचं नाहीये. राज कुंद्रा एका मुलीचे बाप झाल्यानंतर शिल्पा आणि राज एकत्र आले होते. राज कुंद्रा यांची पहिली पत्नी असलेली कविता त्यांच्यापासून फार दुर गेलेली आहे, तिने तिच्या मुलीलाही दुर ठेवलं आहे. त्यामुळे राज कुंद्रा अथवा शिल्पा शेट्टी यांच्या आयुष्यात आज फारसा त्यांचा प्रभाव कुठेही पहायला मिळत नाही. शिल्पा मात्र आपल्या दोन मुलांसोबत सिनेसृष्टीत कायम चर्चेत राहत असते.

यापुढे येते ती अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी. दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी श्रीदेवीचा मृत्यू झाला. श्रीदेवीदेखील एक सावत्र आई होती. बोनी कपुर दोन मुलांचे बाप असतानाही ज्यावेळी श्रीदेवी त्यांच्या आयुष्यात आली त्यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेत श्रीदेवीसोबत विवाह केला. अर्जुन कपूर आणि अंशुल कपूर या सावत्र मुलांनी मात्र श्रीदेवीला फारसं आपली आई मानलं नाही. कायम त्यांच्या नात्यात दुरावा राहिलाच. परंतु श्रीदेवीच्या मुली असलेल्या जान्हवी आणि खुशी या आपल्या सावत्र बहिणींवर अर्जुन कपूर याच विशेष प्रेम आहे. तो त्यांची बरीच काळजी घेतो. आणि कायम त्यांच्याशी संपर्कातही राहतो.

यानंतर येणारी अभिनेत्री म्हणजे हेमा मालिनी. आश्चर्याची बात म्हणजे, हेमा मालिनीचं धर्मेंद्र सोबत लग्न झालं तेव्हा हेमा मालिनी चक्क चार मुलांची सावत्र आई झाली होती. कारण पहिल्या पत्नीपासून धर्मेंद्र यांना चार मुलं होती. हेमा मालिनी आणि त्या चारही मुलांच फारसं नात लहानपणात कधी जुळून आलं नाही. धर्मेंद्रची पहिली पत्नी असलेल्या प्रकाश कौर यांच्यात व धर्मेंद आणि हेमा मालिनीच्या कुटुंबात बऱ्यापैकी दुरावा आजही कायम असल्याचं दिसून येतं. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!