बॉलीवुडमधील हे कलाकार ज्यांनी सतत एकाच प्रकारच्या भुमिका साकारल्या, या अभिनेत्याने अनोखा रेकॉर्डचं बनवला!

बॉलीवुडमधील सिनेसृष्टीत जेव्हा कधी एखाद्या भुमिकेचा विचार केला जातो साहजिकचं भुमिका निभावू शकेल आणि कथेला योग्यरित्या उतरवू शकेल अशा कलाकाराचा विचार त्याकरता केला जातो. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल परंतु असे काही ठराविक कलाकार आहेत ज्यांनी बऱ्याच सिनेमांमधे एकाच प्रकारच्या साच्यातल्या भुमिका निभावल्याच्या पहायला मिळाल्या आहेत. बॉलीवुडमधे सतत एकप्रकारच्या भुमिका सोडता, आपल्या व्हर्सेटाईल भुमिकेसाठी ओळखले जातात आणि त्यांच्या विविधांगी स्वरूपाच्या भुमिकांनी ते नेहमीच रसिकप्रेक्षकांच्या मनात घर करून जातात. अनेक कलाकारांच्या नायकाच्या, काही खास सहकलाकाराच्या तर काही खलनायकाच्यादेखील भुमिका सतत आपल्या नजरेत भरून जातात. परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर असेही कलाकार आहेत ज्यांच्या वाट्याला कायम एकाच प्रकारच्या भुमिका अनेकवेळा आल्या आणि त्यांना खास त्याच गोष्टींकरता आजही ओळखल्या जातं. चरा तर मग आपण जाणून घेऊयात कोण आहेत हे नेमके कलाकार?

सर्वप्रथम बोलायचं म्हटलं तर ती येते एक अभिनेत्री. निरूपा रॉय. निरूपा रॉय हिने तब्बल २०० पेक्षा अधिक सिनेमांमधे काम केलेलं पहायला मिळतं, त्यापैकी जवळपास अधिक सिनेमांमधे तिने एका लाचार आईची भुमिका निभावल्याची पहायला मिळते. अनेक सिनेमांमधे तर ती तिच्या मुलापासून दुरावलेली असायची किंवा काहीतरी परिस्थितीनुसार ती तिच्या मुलांपासून दुरावल्या जात असायची. आजही बॉलीवुडमधे एखाद्या आई या पात्राचा उल्लेख केला तर निरूपा रॉय यांच्या अनेक आईच्या पात्रांच्या छब्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. निरूपा रॉयनेदेखील कायम आईच्या भुमिकेला योग्य तो न्याय दिलेला पहायला मिळतो.

निरूपा रॉय हिच्यानंतर बोलायचं म्हटलं तर ते येतात सईद जाफरी हे कलाकार. सईद जाफरी यांचा जन्म ब्रिटीशमधे झाला, त्यांनी नाट्यक्षेत्रात काम करत अपुर्व किर्तीमान आपल्या कलेच्या जोरावर मिळवलं. सईद जाफरींसारखे कलाकार कायम एकाच साच्यात हिंदी सिनेसृष्टीत बांधल्या गेले. अनेकदा त्यांना अभिनेत्रीचा श्रीमंत बाप याच भुमिकेत दाखवण्यात आले. आणि खास बात म्हणजे, त्यांच्या अनेक सिनेमांमधे ते नायकाला किमान इतकं तर नक्किच म्हणतं असतं की, “निघून जा माझ्या मुलीच्या आयुष्यातून, तू माझ्या मुलीच्या लायक नाहीस.” सईद जाफरी यांच्या वडीलांच्या भुमिकेत ती एक जरब अगदी व्यवस्थितरित्या बसलेली होती, त्यामुळे त्यांना वडीलाचं पात्र अनेकदा करायला मिळालं.

यानंतर येणारं कलाकाराच पात्र म्हणालं तर ते बाबू जी, अर्थात आजोबा. आलोक नाथ याच अभिनेत्याच्या वाट्याला कायम ही भुमिका आलेली पहायला मिळाली आहे. अगदी केवळ सिनेमातचं नाही तर टिव्हीवरील मालिकांमधेही आलोक नाथ यांच्या वाट्याला बाबू जी हीच भुमिका आली. याशिवाय खास म्हटलं तर दुसरी छबी संस्कारी वडीलांची त्यांच्या भुमिकांनी सिनेसृष्टीत निर्माण केली. हम आपके है कौन, मैने प्यार किया, विवाह, हम साथ साथ है यांसारख्या दर्जेदार सिनेमांमधून त्यांनी वडीलांच्या भुमिकेला योग्य न्याय दिल्याच पहायला मिळतं.

यानंतर येणारा अभिनेता म्हटलं तर ते आहेत प्राण. प्राण यांनी हिंदी सिनेसृष्टीत अनेकदा नकारात्मक भुमिकादेखील साकारल्याच आपल्या लक्षात येतं. परंतु त्याखेरीज म्हणाल तर कायमच एका पोलीसाच्या भुमिकेत ते पहायला मिळतात. त्यांच्या पोलीसाच्या भुमिकेला एक खास लहेजा असा होती की, ते एक ईमानदार पोलीसचं असल्याचे पहायला मिळतात. सत्तरच्या दशकात कायम ईमानदार पोलीस अधिकारी वेळेप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून काम करणारे अशा ठराविक साच्यातल्या भुमिकांची ठेवणं त्यांच्या वाट्याला आल्याची पहायला मिळते.

यानंतर येणारी अभिनेत्री म्हणजे किरण खेर. किरण खेर ही कायमचं एका ठराविक भुमिकेत दाखवण्यात आलेली अभिनेत्री आहे. तिच्या वाट्याला पंजाबी आईची भुमिका सर्वाधिक वेळा वाट्याला आली आहे. रंग दे बसंती, दोस्ताना, हम तुम यांसारख्या कितीतरी सिनेमांमधे किरण खेर एका पंजाबी आईच्या भुमिकेत असलेली पहायला मिळते. आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!