The Biggest Love Locha In ‘Love Lagna Locha’ Zee Yuva

2088

लव्ह लग्न लोचा मध्ये होतोय सर्वात मोठा लव्ह लोचा !!

Zee Yuva झी युवावरील , लव्ह लग्न लोचा ही मालिका त्यात सतत होणाऱ्या अनेक लोच्यांमुळे जबरदस्त हिट झाली आहे . राघव , सुमित , विनय , अभिमान , शाल्मली  , काव्या , आकांशा आणि सौम्या ह्या मालिकावीरांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर आजच्या तरुणाईच्या हृदयात घरं  केली आहेत. ज्या प्रमाणे या मालिकेतअभिमान शाल्मली , विनय आकांशा , सुमित सौम्या अश्या जोड्या होत्या तिथे केवळ राघव आणि काव्या हे दोघेच “Singal Status ” घेऊन होते . मात्र हळू हळूयांच्या दोघांमध्ये सुद्धा हल्लीच्या काही एपिसोड्स मध्ये भावनिक गुंतवणूक दिसत होती . राघव म्हणजेच विवेक सांगळे आणि काव्या म्हणजेच रुचिता जाधव जेआधी एकमेकांशी नुसते भांडायचे ते मात्र एकमेकांच्या प्रेमात पडताना दिसत आहेत . . राघव च्या होणाऱ्या डान्सच्या भव्य कार्यक्रमात राघव आणि काव्याचे नातेजुळणार आहे . या कार्यक्रमाची तयारी करत असतानाच या दोघांचे एकमेकांवरील प्रेम एकमेकांना समजू लागले होते . आणि या कार्यक्रमात हे दोघे एकत्र एक उत्कृष्टडान्स सादर करणार आहेत. राघव आणि काव्याच्या या नात्यावर आता शिक्का मोर्तब होणार आहे पण त्याच बरोबर सुमित म्हणजेच ओंकार गोवर्धन आणि सौम्याम्हणजेच अक्षया गुरव चे नाते मात्र कायमचे तुटणार आहे . आता हा लोचा का आणि कसा होणार आहे  हे  या मालिके च्या  या आठवड्यातील भागांमध्ये प्रेक्षकांनापहायला मिळेल. लव्ह लग्न लोचा ही मालिका सोमवार ते शुक्रवार रोज रात्री ८ :३० वाजता  झी युवावर पहायला मिळेल .