छत्रपती शिवाजी महाराज यांचा विश्वासू मावळ्यापैकी एक असलेला मावळा म्हणजेच तानाजी हा होय. या शूर, पराक्रमी मावळ्याची कहाणी तानाजी या चित्रपटाच्या माध्यमातून थेट हिंदीतुन भारतभर झळकत आहे. चित्रपटाची सर्वतत्रच चांगली चर्चा देखील सुरू आहे. या चित्रपटात तानाजीची भुमीका अभिनेता अजय देवगन निभावत आहे.

त्यासोबतच या चित्रपटात काजोल, सैफअली खान, शरद केळकर तसेच अजिंक्य देव सारखे स्टार कास्ट देखील आहेत.
परंतू बाॅलीवूडच्या एका हिंदी चित्रपटात महाराष्ट्रच्या मातीत जन्मलेल्या एका सामान्य कैलास वाघमारे देखील थेट खलनायकाची भुमीका साकारताना दिसत आहे. कैलास वाघमारेचा जन्म मराठवाड्यातील जालना या जिल्ह्यात झाला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले.

या नंतर काॅलेज मध्ये होणार्या अनेक नाटकांच्या स्पर्धेतून अभिनयाचा प्रवास चालू ठेवला. अभिनय समजण्यासाठी एका विशिष्ट शिक्षणाची गरज असते म्हणून कैलासने नाट्यशास्त्रातून पदवी संपादन केली आणि धडपडत राहिला. त्यानंतर कैलासला “शिवाजी अंडरग्राउंड भिम नगर मोहल्ला” या नाटकात एका कट्टर मावळ्याची भुमीका साकारण्यास मिळाली आणि हे नाटक त्याच्या आयुष्यात कलाटणी देणारा ठरला.

त्यानंतर त्याला मनातल्या उन्हात या चित्रपटात प्रमुख भुमीका मिळाली आणि कैलाशचे आयुष्यच पालटले. यानंतर कैलासने धडपडणे चालूच ठेवले. अचानक एक दिवस कैलासचा कास्टींग डायरेक्ट मित्राने तानाजी चित्रपटासाठी ओम राउतांना कैलासची ऑडीशन दाखवली आणि कैलासचे नशीबच पलटले.

तानाजीत त्याला खरतर वेगळ्या भुमीकेसाटी कास्ट केले होते. पण त्याचे अभिनय पाहून. त्याला खलनायकाची भुमीका देण्यात आली. एका खेड्यातून ते बाॅलीवूड पर्यंत मजल मारणाय्रा या कलाकाराला. सध्या अनेक चित्रपटात काम करण्यासाठी निर्मात्यांचे रांगा लागत आहेत. कैलासने तानाजी नंतर घोडा, हिरवी तसेच मंडळ आपलं आभारी आहे या मराठी चित्रपटात प्रमुख भुमीका साकारताना दिसणार आहे.

तसेच नुकताच त्याने गाभ नावाचा एक चित्रपट देखील साईन केले आहे. कैलासने प्रचंड जिद्दीने,चिकाटीने इथवर मजल एका शूर मावळ्या सारखीच मारली. त्यामुळे हरहुन्नरी या कलाकार मित्राला स्टार मराठीचा सलाम आणि पुढील प्रवासाला शुभेच्छा!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.