अजय देवगण स्टारर सिनेमा ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’ चा धमाकेदार ट्रेलर आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर बेतलेल्या या सिनेमात अजयने दमदार परफॉर्मन्स साकारला आहे. या ट्रेलरने सोशल मिडियावर धुमाकुळ घातला आहे. या सिनेमाच्या ट्रेलरवर लोकांनी लाईक्सचा पाऊस पाडला आहे.

या ट्रेलरमुळे अजयवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या सिनेमाची दखल मा. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील घेतली आहे. मनसे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटर वर “हिंदी चित्रपट मराठी भाषेत डब करून प्रदर्शित करण्याला मनसेचा विरोध आहेच, परंतु तान्हाजी हा सिनेमा जगभरातल्या भाषांत डब करून प्रदर्शित व्हावा.

या निमित्ताने आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या निधड्या मावळ्यांचा पराक्रम जग पाहील. दिग्दर्शक ओम राऊत आणि अभिनेता अजय देवगण यांचे अभिनंदन.” असे ट्वीट करत अजय देवगणच्या ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ सिनेमाला मराठीमध्ये डब करण्याची परवानगी दिली आहे.