ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

आपल्या सगळ्यांचे लाडके सूत्रसंचालक डॉ. निलेश साबळे, हे आता ‘झी युवा’ वाहिनीवर सुद्धा दिसत आहेत. ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा एक आगळावेगळा, जबरदस्त कार्यक्रम ते घेऊन आले आहेत. प्रेक्षकच प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेला हा कार्यक्रम सर्वांनाच खूप आवडलेला आहे. पहिल्या भागात, विकास जायफळे याने, वेगवेगळ्या व्हिडीओजच्या माध्यमातून आपले सगळ्यांचे भरपूर मनोरंजन केले आहे. निलेश साबळे यांचा हा नवा अवतार सगळ्यांच्या पसंतीस उतरला आहे. आपल्यासारख्याच इतर मंडळींना थेट टीव्हीवर पाहायची संधी मिळत असल्यामुळे, प्रेक्षक खूपच खुश आहेत. महाराष्ट्रातील जबरदस्त टॅलेंट पहिल्या भागात पाहायला मिळाले आहे.

लॉकडाऊनच्या काळात हा नवा कार्यक्रम पाहायला मिळत असल्यामुळे, प्रेक्षकांना मनोरंजनाचे हक्काचे साधन मिळाले आहे. त्याशिवाय, प्रेक्षकांना यात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले व्हिडीओ लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न अनेक मंडळी करत आहेत. लॉकडाऊनमधील विरंगुळा म्हणून, हा सर्वोत्तम पर्याय ठरला आहे. अशावेळी, घरबसल्या कलाकारी करणाऱ्या या कलाकारांना, ‘झी युवा’ वाहिनी थेट टीव्हीच्या माध्यमातून प्रसिद्धी देणार असल्यामुळे, प्रेक्षकांना हा कार्यक्रम आपलासा वाटत आहे. पहिला भाग पाहिल्यानंतर, प्रेक्षकांचा प्रतिसाद आणखी वाढला आहे. आपलं टॅलेंट सुद्धा जगासमोर यावं, यासाठी अनेकजण प्रयत्नशील आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार, एकाच दिवसात तब्बल दहा हजारांहून अधिक लोकांनी वाहिनीला व्हिडीओ पाठवले आहेत. यातून व्हिडीओजची निवड करणे आणि उत्तम व्हिडीओज प्रेक्षकांना दाखवणे, ही तारेवरची कसरत आता वाहिनीला करावी लागणार आहे. अर्थात, प्रेक्षकांचा असा भरभरून प्रतिसाद मिळत असल्यामुळे, हा कार्यक्रम अधिक दर्जेदार होत जाणार यात शंकाच नाही. महाराष्ट्रभरातून उत्तमोत्तम टॅलेंट पाहायला मिळणार आहे. ‘लाव रे तो व्हिडीओ’ हा नवाकोरा कार्यक्रम प्रेक्षकांचे भन्नाट मनोरंजन करणार आणि सगळ्यांना भरपूर हसवणार, हे नक्की!!