ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

बिझनेसमन ललित मोदीसोबतच्या रिलेशनशिपमुळे सुष्मिता सेनला सध्या सोशल मीडियावर ‘गोल्ड डिगर’ म्हटले जात आहे. ज्यावर अभिनेत्रीने आता ट्रोल करणाऱ्यांना चांगलच प्रत्युत्तर दिले आहे. बॉलीवूड अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध उद्योगपती ललित मोदीसोबतच्या असणाऱ्या तिच्या नात्याबद्दल सतत चर्चेत येत आहे.

नुकतेच सुष्मिताने आपल्यापेक्षा १० वर्षांनी मोठे असलेल्या ललित मोदीसोबतच्या तिच्या नात्याची अधिकृत माहिती दिली आहे. ललित मोदींनी ट्विटरवर सुष्मिता सेनसोबतचा एक फोटो शेअर करून खळबळ उडवून दिली आहे.

ही बातमी समोर आल्यानंतर सुष्मिताला सोशल मीडियावर भरपूर ट्रोलही केले जाऊ लागले आहे.  दोघांच्या नात्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मीम्सही बनवले जाऊ लागले. युजर्स त्यांच्या कमेंट्सद्वारे अभिनेत्री सुश्मिता सेन ला न जाणो काय काय म्हणत आहेत.

एका यूजरने सुष्मिताला गोल्ड डिगरचा टॅगही दिला. तर कुणी पैसाच या नात्याच सर्वकाही असल्याचं म्हणून सांगितले आहे. आता या सर्व बातम्यांवर सुष्मिता सेनने मौन तोडले असून ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर तिने दिले आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत सुष्मिता सेनने एक लांब आणि रुंद नोट लिहिली आहे.

याच्या कॅप्शनमध्ये सुष्मिताने लिहिले आहे की, “गेल्या काही दिवसांपासून, गोल्ड डिगर आणि संपत्तीचा लोभी म्हणत माझे नाव सोशल मीडियावर खूप खराब केले जात आहे. माझ्यावर जोरदार टीका होत आहे. पण मला या टीकाकारांची अजिबात पर्वा नाही. सोन्याला नाही तर हिऱ्यांना न्याय देण्याची क्षमता माझ्यात आहे.

अशा स्थितीत काही बुद्धीजीवींच्या माध्यमातून मला गोल्ड डीगर अशी हाक मारणे यावरून त्यांची खालची मानसिकता स्पष्टपणे दिसून येते. या क्षुल्लक लोकांव्यतिरिक्त मला माझ्या हितचिंतकांचा आणि कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा आहे. कारण मी सूर्यासारखी आहे जी स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि विवेकासाठी सदैव चमकेल.

सुष्मिता नेहमीच तिच्या नात्यामुळे चर्चेत असते. यापूर्वी ही अभिनेत्री तिच्यापेक्षा लहान असलेल्या रोहमन शॉलला डेट करत होती. त्यानंतर अचानक त्यांच्याकडून सर्व काही संपवून आता ही अभिनेत्री स्वतःहून 10 वर्षांनी मोठ्या ललित मोदीला डेट करत आहे.