Aakash Thosar New Marathi FU

‘Parshya’ aka Akash Thosar is back & this time with a new ‘Archi’ Sanskruti Balgude. Mahesh Manjrekar’s upcoming Marathi film ‘FU’ stars Aakash Thosar & Sanskruti Balgude in the lead. The first teaser poster of ‘FU’ was revealed on social media by none other than Bollywood sup erstar Salman Khan through his official twitter handle.

सुपरस्टार सलमानने केले F.U. चे टीजर पोस्टर लॉन्च !

– आकाश ठोसरचा नवीन चित्रपट . 

–  जूनला होणार रिलीज .

नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारावर मराठीचित्रपटांनी मोहोर उमटवली आणि त्यामुळे मराठीचित्रपट सृष्टीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहेआणि त्यातच, आज अजूनच सळसळत्या चैतन्याची भरपडली आहे ! त्याला कारणही तसं जबरदस्त आहे ! महेशमांजरेकरांचा बहुचर्चित आगामी ‘F.U.’ या चित्रपटाचे‘टीजर पोस्टर’, बॉलिवुड सुपरस्टार आणि महेशमांजरेकरांचा खास मित्र सलमान खान याने आज ट्वीटकेले आहे.

या पोस्टर मध्ये आजकालच्या तरुणांचा ‘yo स्टाइल’-स्टायलिश हात दिसत आहे ! हातामध्ये फॅशनेबल लेदरचेब्रेसलेट आणि तरुणांचे फेवरेट लेदर जॅकेट दिसत आहे ! ‘He is back’ असे ठळकपणे लिहिलेल्या यापोस्टरवरून नक्कीच एक प्रश्न पडतोय की सैराट मधूनलोकांच्या घराघरात आणि मनामनात पोहोचलेला‘चॉकलेट बॉय’, आकाशचा ‘F.U.’ या नव्या चित्रपटातनक्की कसा लूक असेल ?

शिवाय, ‘F.U.’ चे पुढील पोस्टर १४ एप्रिललासकाळी ११.३५ ला सोशल मिडियावर लॉन्च होईल

प्रेक्षकांना पुढच्याही पोस्टरची जबरदस्त उत्सुकता लागलीये  म्हणे कारण त्या पोस्टर मध्ये तरी आकाशचानवा लूक दिसेल का ? आकाशचा नवा लूक आणि महेशमांजरेकरांचा नवा सिनेमा, म्हणजे तो भन्नाटच असणारआहे अशी जोरदार चर्चा सिनेसृष्टीत चालू आहे ! त्यामुळे‘F.U.’ हा, भन्नाट नावाचा   भन्नाट चित्रपट, २ जूनलाप्रदर्शित होईपर्यंत, सोशल मिडियावरील या चित्रपटाच्याभन्नाट पोस्ट्स पाहण्याची आणि शेयर करण्याची सगळ्यांना जबरदस्त उत्सुकता लागून राहिली   आहे.