सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमधील अनु आणि सिध्दार्थची जोडी बघता बघता संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी जोडी बनली… या दोघांच्या सुख – दु:खात, त्यांच्या अडचणीमध्ये प्रेक्षकांनी त्यांची साथ दिली… अनु आणि सिध्दार्थ सोबत ते हसले, रडले त्यांना भरपूर आशिर्वाद दिले… प्रेक्षक या दोघांचे लग्न कधी होईल याची वाट आतुरतेने बघत होते आणि अखेरीस तो क्षण आला, अनु – सिद्धार्थचा विवाह सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. या दोघांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला. या सगळ्यामध्ये आता मालिकेने ३०० भागांचा टप्पा यशस्वीरित्या पार केला आहे. आजवर प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच हे होऊ शकले यात शंका नाही….

 मालिकेतील सगळ्या कलाकारांनी, मालिकेच्या संपूर्ण यूनिटने हा क्षण खूप उत्साहात आणि आनंदात साजरा केला…  केक कट केला, सेल्फी देखील काढला… तेंव्हा नक्की बघा सुखाच्या सरींनी हे मना बावरे सोम ते शनि रात्री ९.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.