नुकतीच मिस इंडिया 2020 स्पर्धा पार पडली. ह्यात फर्स्ट रनरअप ठरलेली मान्या सिंगने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. कारण ठरला तो तिचा खडतर प्रेरणादायी प्रवास. तिच्या ह्या यशासाठी सर्वांसाठीकडूनच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मान्याने तिच्या स्ट्रगलबद्दल सांगितले की, “मी बर्‍याच रात्री काहीही खाल्ल्याशिवाय उपाशी आणि झोपेशिवाय घालवल्या आहेत. मी अनेक दिवस अनेक मैल चालत घालवले आहेत. मला हा विजय मिळविण्यासाठी माझ्या रक्त, घाम आणि अश्रूंनी प्रोत्साहित केले आहे.” मी रिक्षाचालकाची मुलगी आहे आणि मला कधीच शाळेत जाण्याची संधी मिळाली नाही कारण मी लहान वयातच काम करायला लागले होते. मला पुस्तकांबद्दल तळमळ होती, पण नशिबाने मला साथ दिली नाही. “

मान्या पुढे म्हणाली, “शेवटी, माझ्या पालकांनी माझ्या आईचे दागिने थोड्या काळासाठी तारण ठेवले जेणेकरुन मी माझ्या परीक्षेची फिस भरुन डिग्री मिळवू शकेल. माझ्या आईने माझ्यासाठी खूप त्रास सहन केला आहे. मी 14 वर्षांची होते तेव्हा घरातून पळून गेले होते. मी दिवसा अभ्यास करायचे, संध्याकाळी भांडे धुवायचे व रात्री कॉल सेंटरमध्ये काम करायचे. मी तासनतास चालून माझ्या जागेवर पोहोचायचे जेणेकरुन मी रिक्षाचे भाडे वाचवू शकेल. आज फेमिना मिस इंडिया 2020 च्या मंचामुळे माझ्या पालकांना आणि धाकट्या भावाला अभिमान वाटेल. त्यासोबतच मला हे सांगावं वाटतं की जर आपण आपल्या स्वप्नांसाठी आणि आपल्या स्वतःसाठी वचनबद्ध असाल तर जगातील सर्व काही शक्य आहे.”

“आमच्यासारखे लोक स्वप्नसुद्धा पाहत नाहीत आणि तू मिस इंडिया जिंकण्याचा विचार करीत आहेस?” असे सांगत मान्या सिंगने तिची मिस इंडियाचे जेतेपद पटकावण्याची इच्छा व्यक्त केल्यावर तिच्या पालकांची प्रतिक्रिया सांगितली.

मिस इंडियाबद्दल सांगताना मान्या म्हणाली “मला जाणवले की मिस इंडिया नावाचे हे व्यासपीठ आहे जिथे मी माझी भूमिका व्यक्त करू शकतो. त्या स्त्रियांचा आवाज व्हा ज्यांना सांगण्यात येते की स्त्रियांना बोलण्याचा अधिकार नाही.”

फेमिना मिस इंडिया 2020 चा किताब तेलंगणामध्ये इंजिनिअर असलेल्या मानसा वाराणसीने जिंकला असून हरियाणाच्या मानिका श्योकंद हिने मिस ग्रँड इंडिया 2020चा किताब पटकावला आहे. तर मान्याने मिस इंडिया 2020 चा फर्स्ट रनरअपचा किताब पटकावला आहे.

मान्याच्या ह्या यशासाठी माजी मिस वर्ल्ड, अभिनेत्री मानुषी छिल्लरने अभिमान व्यक्त केला आहे. मानुषी व इतर काही कलाकारांनी ही आनंद व्यक्त केला आहे. मान्याच्या ह्या मोठ्या विजयाबद्दल मानुषीने सोशल मीडिया पोस्ट करून आणि तिच्या संघर्षाला सलाम केला आहे.