बाप डॉक्टर तर पोरगं पण डॉक्टर. तसं बाप किंवा आई अभिनेता अभिनेत्री तर मग मुलं सुद्धा पावलावर पाऊल टाकायच्याच तयारीत असतात. सध्या इंडस्ट्रीत असे अनेक स्टार किड्स आहेत की जे पुढे चालून मोठं अभिनेता होण्याची स्वप्ने पाहत आहेत. चला तर मग जाणून घेऊ ते कोण आहेत.

बॉलिवूड कलाकारांसोबतच स्टारकिड्सची देखील चर्चा मोठ्या प्रमाणात होत असते. अभिनेत्री सारा अली खान, अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेत्री जान्हवी कपूर या सगळ्या किड्सनी कलाविश्वात आपली एक ओळख निर्माण केली आहे.

आता सगळ्यांचे लक्ष हे शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान पासून सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान हे स्टार किड्स बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार या कडे लागले आहे. कारण शाहरुख खान ने खूप काही कमावलं आहे. तर आता पोरगं काय दिवा लावतोय हे पाहण्याकरिता सगळ्यांचे लक्ष लागलेलं आहे.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान हा शाहरूख सारखाच दिसतो. तो सोशल मीडियावर सक्रीय नसला तरी त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात.

सुहाना खान अभिनेत्री होण्याची तयारी करत असताना आर्यनने कधीच अभिनेता होण्याची इच्छा व्यक्त केली नाही. शाहरूख एका मुलाखतीत म्हणाला होता की, “आर्यनला कॅमेऱ्या समोर नाही तर कॅमेऱ्याच्या मागून काम करण्याची इच्छा आहे.” आता आर्यन नक्की काय करणार आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

सैफ अली खान सारखा हुबेहुबे दिसणारा त्याचा मुलगा इब्राहिम अली खानने यापूर्वीही अनेक वेळा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सारा बऱ्याच वेळा तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर इब्राहिमचे फोटो शेअर करताना दिसते.

इब्राहिम बऱ्याचवेळा साराच्या इन्स्टा रिलमध्ये वगैरे दिसला आहे. इब्राहिमला त्याचे आजोबा मन्सूर अली पतौडी सारखीच क्रिकेट खेळण्याची आवड आहे. साराने आधीच आपल्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकली आहेत. आता इब्राहिम बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार की क्रिकेटमध्ये करिअर करणार या कडे सगळ्यांचे लक्ष आहे.

अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटिया हा त्याच्या वडीलांसारखाच हॅंडसम आहे. आरवने स्वत:ला नेहमीच मीडियापासून लांब ठेवले आहे. असं म्हणतात की आरवला अभ्यासात रुची आहे. मुंबईत त्याचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर तो लंडनला पुढचं शिक्षण पुर्ण करण्यासाठी जाणार आहे असे अक्षय म्हणाला होता

अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी याने याआधीच त्याच्या चित्रपटाचे चित्रीकरण केले असून आता फक्त प्रदर्शित होण्याची वाट पाहत आहे. अहान शेट्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहतो. त्याची बहीण अभिनेत्री अथिया शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओलच्या पदार्पणानंतर आता सर्वांच्या नजरा बॉबी देओलचा मोठा मुलगा आर्यमान देओलकडे लागले आहे. बॉबीने अनेक वेळा आर्यमानचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तर असे अनेक स्टार किड्स आहेत की जी मोठी झालेली आहेत. आता पुढे ते केव्हा अभिनेते होतील हे मात्र लवकर सांगता येणार नाही. पण बाळकडू असल्याने त्यांना इंडस्ट्रीत लवकर कामे मिळतील अशी आशा आहे. त्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.