सध्या अनेक कलाकार अभिनेते अभिनेत्री अभिनेत्री लग्न करताय नाहीतर काहीजण कुठंतरी फिरायला जातायत. कारण लॉक डाऊन मुळे ते सगळी मंडळी त्रस्त आहे. त्यात मग एक मराठी मधली प्रसिद्ध अभिनेत्री कशी मागे राहील ? तीही एका खूप भारी ठिकाणी फिरायला गेली आहे.

आता तिचं नाव काय ? याची आपल्याला उत्सुकता लागलेली असेल तर चला मग जाणून घेऊयात. की ती अभिनेत्री कोण ? जी फक्त फिरायला म्हणून बाहेर गेलीय. भारतातच फक्त हिमाचल ला.

प्राजक्ता माळीने आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत. छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारे सौंदर्य आणि अदा तसेच लक्षवेधी स्टाईल यामुळे प्राजक्ताने अल्पावधीतच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.

प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. चित्रीकरणाच्या वेळेसचे फोटो, व्हॅकेशनचे फोटो प्राजक्ता सोशल मीडियावर पोस्ट करत असते. मात्र आता तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे.

प्राजक्ता माळी हिने नुकतेच इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की, आजूबाजूचे जवळपास सगळेच एक तर लग्न करतायेत नाहीतर उत्तरेला फिरायला जातायेत…म्हटलं आपणही जे सहज शक्य आहे ते करूया. ऑफ टू व्हॅकेशन. हिमाचल प्रदेश.

प्राजक्ता माळीला जुळून येती रेशीमगाठी या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे.

छोटा पडदा असो किंवा रुपेरी पडदा प्राजक्ताच्या अभिनयावर रसिक फिदा आहेत. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी प्राजक्ताने लॉकडाउन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

प्राजक्ता माळी ही खूप लोकप्रिय अशी उत्तम अभिनेत्री आहे. तीने अजून लग्न केलेलं नाहीये. ती तिच्या मनासारखे जीवन जगत आहे. तर तिला तिच्या हिमाचल ट्रिप साठी स्टार मराठी कडून खूप खुप शुभेच्छा..

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.