Siddharth Spruhas Love Story In The Journey of Mumbai To Goa

 

Zee Yuva Prem He Marathi Serial Cast Wiki Actor Actress Photos

झी युवावरप्रेम हेची दुसरी गोष्टमुंबई टू गोवा

स्वभावातले एकही टोक जुळत नसूनही जेव्हा दोघांची मनं जुळतात तेव्हा हमखास समजावं की ती  दोघं एकमेकांमध्ये गुंतली आहेत.फक्त त्या गुंतण्याची जाणीव व्हावी लागते. ती झाली की प्रेमाचा अंकुर फुलायला वेळ लागत नाही. अनपेक्षितरित्या एका प्रवासात दोघांचं सोबतजाणं आणि तो प्रवास करता करता आयुष्याचाच प्रवास एकत्र करण्याचा विचार करणारं गुलाबी नातं जुळून येईल का ही कल्पनाच कितीसुखावणारी आहे ना…प्रेम हे या मालिकेतील नव्या एपिसोडमध्ये श्री आणि श्वेता यांच्या प्रेमाच्या नात्याची हीच गंमत दिसणार आहे.  झीयुवावर , येत्या सोमवार ६ मार्च  आणि मंगळवार ७ मार्च ला रात्री ९ वाजता  ,  “मुंबई टू गोवा “ हि प्रेम हे या मालिकेची नवीन गोष्ट पाहायलामिळेल

siddharth Spruha Joshi Zee Yuva Marathi

 

श्री म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर हा इंजिनियरिंग स्टुडन्ट , मनसोक्त जगणारा..प्रत्येक गोष्टीत आनंद शोधणारा.. प्रत्येक श्वासात निसर्ग भरूनघेणारा … नेहमी स्वप्नात रमणारा… सतत चेहऱ्याव स्मितहास्य , अगदी मुक्त मोकळ्या आकाशासारखा ..हॅपी गो लकी.  श्वेता  म्हणजेच स्पृहाजोशी ही म्हणजे अगदी त्याच्या विरुद्ध …जेव्हापासून हातात पुस्तक आलय ते आजपर्यंत कधी सुटलेच नाही . शालेय जीवनातही अभ्यासआणि त्याशिवाय काहीच केलं नाही . सतत ऑफिसची प्रेसेंटेशन्स , गॅझेटस, इलेक्ट्रॉनिक वस्तू , लॅपटॉप आणि मोबाईल  हेच तीच आयुष्य.श्वेता म्हणजे ऑनलाइन हे समीकरणच अगदी पक्कं. फोन स्वीचऑफ किंवा लॅपटॉपचं चार्जिंग संपलं की श्वेताची अस्वस्थता तिच्या चेहऱ्यावरस्पष्ट दिसणार. आता  या अशा दोन टोकाच्या स्वभावाच्या व्यक्ती जेव्हा मुंबई ते गोवा एवढा मोठा प्रवास एकत्र करणार म्हणजे किती आणिकशी मजा आपल्याला पाहायला मिळेल हे सांगायला नको .

Spruha Joshi Siddharth Zee Yuva

 

श्रीच्या कॉलेजची ट्रिप गोव्याला निघाली असते . पण नेहमीप्रमाणे श्रीला उशीर होतो. आणि त्याची बस त्याला न घेताच निघून जाते .श्वेताहीगोव्यालाच निघाली आहे. सोशल मीडिया मॅनेजर असलेली श्वेता विमानाने गोव्याला जाऊ शकत असतानाही  केवळ प्रेझेंटेशन पूर्ण करण्यासाठीकार भाड्यावर घेते . या प्रवासाला निघणार इतक्यात कार एजंटच्या विनंतीखातर श्रीला ती लिफ्ट द्यायचं मान्य करते पण तिच्या अटींवर …आता १० १२ तासांचा हा प्रवास. एकीकडे मनमोकळा स्वच्छंदी श्री आणि दुसरीकडे कडक आणि कामात व्यग्र होऊन जाणाऱ्या श्वेताच्या अटीमान्य  करतो ..की स्वतःच्या स्वभावानुसार प्रवास एन्जॉय करतो .. मुंबई टू गोवा हा प्रवास हे दोघे पूर्ण करतात की प्रवास अर्धवट राहतो …आणि मुख्य म्हणजे श्री आणि श्वेता एकमेकांच्या प्रेमात पडतात, त्यांच्या स्वभावातील विरोधाभास त्यांच्या वाटा वेगळं करतो की एकमेकांशीअव्यक्त राहतात हे सर्व पाहण्यासाठी  सोमवार ६ मार्च  आणि मंगळवार ७ मार्च ला रात्री ९ वाजता  झी युवावर पहा “मुंबई टू गोवा “ची अफलातूनट्रॅव्हल स्टोरी ..

Prem He Location Shoot Siddharth and Spruha Joshi Photos

Prem He

Prem He Location Shoot Siddharth and Spruha Joshi Photos

 

Prem He Location Shoot Siddharth and Spruha

Siddharth and Spruha Joshi Photos

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here