Shweta Shinde Photo
झी युवावरील डॉक्टर डॉन या मालिकेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळतोय. मालिकेची कथा हटके आहेच पण यातल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने या कथेला चांगला न्याय दिलाय हे महत्वाचे.
म्हणूनच सोशल मिडीयावरुन किंवा वैयक्तिक स्तरावरही यातल्या कलाकारांना प्रेक्षकांची पसंतीची पावती मिळतेय. डॉ. मोनिका श्रीखंडे म्हणजे प्रेक्षकांची लाडकी डॉलीबाई महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करतेय.
तिचा अभिनय तसंच मालिकेतील लुक प्रेक्षकांच्या भलताच पसंतीस पडला आहे.
अलीकडेच डॉक्टर डॉन मालिकेच्या शूटिंगच्या दरम्यान श्वेताने एक लाल साडीतील एक फोटो काढून सोशल मीडियावर अपलोड केला आणि लाल हा माझा आवडता रंग आहे कारण तो उठून दिसतो असं तिने त्यावर म्हंटल आहे.
या साडीमध्ये श्वेताचं सौंदर्य अजूनच खुलून दिसतंय. डॉक्टर डॉन मालिकेत श्वेताचा लुक हा हटके आहे. ती रोज प्रेक्षकांना वेगवेगळ्या सुंदर साड्यांमध्ये वावरताना दिसते आणि त्यातीलच या लाल रंगाच्या साडीतील श्वेताच्या फोटोवर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.