KGF Chapter 2 ची रीना देसाई म्हणजेच श्रीनिधी शेट्टी आजकाल चित्रपटासाठी च्या तिच्या जास्त मागणीमुळे चर्चेत आहे. श्रीनिधी शेट्टी विक्रमच्या आगामी चित्रपट कोब्रामध्ये मुख्य भूमिकेत असून तिने तिची फी दुप्पट केली आहे. या चित्रपटासाठी ती भरमसाठ फी घेत आहे.
‘केजीएफ’ हा कन्नड चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यातील प्रत्येक पात्र खूप प्रसिद्ध झाले. रॉकी भाईच्या ‘केजीएफ चॅप्टर 1’ आणि 2 या दोन्हीमध्ये श्रीनिधी शेट्टीने त्याच्या प्रेमिकेची भूमिका केली होती. या फ्रेंचायझीमुळे ती जगभरात लोकप्रिय झाली. आता यशची नायिका श्रीनिधीच्या फिज शी संबंधित अनेक तपशील समोर येत आहेत.
‘KGF 2’ च्या यशानंतर श्रीनिधी शेट्टीने तिची फी वाढवली असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. तिने तिच्या आगामी ‘कोब्रा’ चित्रपटासाठी दुप्पट फीची मागणी केली आहे.
श्रीनिधीने प्रशांत नीलच्या KGF चॅप्टर 2 साठी 3 कोटी रुपये घेतले होते, असे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. आता तिने तिच्या आगामी ‘कोब्रा’ चित्रपटासाठी 7 कोटी रुपयांची मागणी केली आहे. ही मागणी ऐकून तिच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. श्रीनिधी KGF च्या तुलनेत दुप्पट शुल्क आकारत आहे. त्याचबरोबर, या बातम्यांबाबत अधिकृत माहिती अजून तरी समोर आलेली नाही.
इरफान पठाणही दिसणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो की साऊथचा सुपरस्टार विक्रम कोब्रा या चित्रपटात दिसणार आहे आणि या चित्रपटात श्रीनिधी शेट्टी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या अॅक्शन थ्रिलर चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन आर. अजय ज्ञानमुथू यांनी केले आहे. तर या चित्रपटाची एक खास गोष्ट सुद्धा आहे आणि ती म्हणजे यात क्रिकेटर इरफान पठाण देखील दिसणार आहे. तसेच कोब्रा हा चित्रपट यावर्षी 11 ऑगस्ट 2022 रोजी रिलीज होत आहे.
KGF Chapter 3 मध्ये श्रीनिधी शेट्टी दिसणार नाही…!KGF Chapter 2 मध्ये, चाहत्यांनी पाहिले की रीना देसाई ला (श्रीनिधी शेट्टी) गोळी मारली गेली आणि त्यांचेच तिचा मृत्यू देखील झाला. अशा परिस्थितीत ती प्रशांत नील आणि यश यांच्या चित्रपटाच्या तिसर्या भागात दिसणार नसल्याचे आता सर्वत्र समजले जात आहे. तरीसुद्धा निर्मात्यांनी अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नसल्याची माहिती समोर येत आहे.