मित्रांनो!, सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे “बिग बॉसचं घर. सध्या एक धक्कादायक बातमी हाती आलीय आणि ती म्हणजे “माऊली” म्हणून बिग बॉसच्या घरात फेमस असणाऱ्या सुप्रसिद्ध महिला कीर्तनकार शिवलीलाताई पाटील या बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या आहेत. या बद्दल अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. काय आहे नक्की कारण? चला जाणून घेऊ या…
मित्रांनो!, प्रेक्षकांच्या मते बिग बॉसचे घर हे फक्त भांडणाचं घर आहे. इथे फक्त काड्या, कुचाळक्या एवढचं केलं जातं असं प्रत्येक जण म्हणतं. पण मी असा विचार करून आले होते, की जेव्हा इथे येईन ना तेव्हा प्रत्येक माणूस माझा असेल. मी आठ दिवस जरी राहिले ना तरी ज्यादिवशी मी घरातून बाहेर पडेन ना त्यादिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल.” बिग बॉसच्या घरातील स्पर्धक आणि शिवलीला पाटील या आपल्या सहकाऱ्यांना म्हणत होत्या.
बिग बॉसच्या घरात ‘नाव मोठे लक्षण खोटे’ हा नॉमिनेशन टास्क झाला. या नॉमिनेशमध्ये घरातील अपुरे योगदान, घरातील वावर, कार्यातील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठीची अकार्यक्षमता या निकषांवर घरातील स्पर्धकांना नॉमिनेट करायचे होते. या टास्कमध्ये शिवलीला यासुद्धा नॉमिनेट झाल्या होत्या. नॉमिनेशननंतर त्यांनी आपली बाजू मांडताना म्हटलं की, मी घरातून बाहेर पडेन ना त्यादिवशी प्रत्येकाच्या डोळ्यात माझ्यासाठी पाणी असेल.
आणि अखेर शिवलीलाताई पाटील यांना खरंच घराबाहेर पडावं लागलं…अर्थात, त्या एलिमिनेट किंवा बाद होऊन बाहेर पडल्या नाहीयेत. त्या मागील खरे कारण हे आहे की, तब्येत बरी नसल्यामुळे त्यांना वैद्यकीय उपचारासाठी घराबाहेर पाठवण्यात येत असल्याचं बिग बॉसनं म्हटलं आहे. बुधवारी (29 सप्टेंबर) त्या उपचारांसाठी घरातून बाहेर पडल्या. शिवलीला बाहेर पडल्यामुळे सध्या बिग बॉसच्या घरातील वोटिंग लाइन्स बंद करण्यात आल्या आहेत.
‘युवा कीर्तनकार ही ओळख, कीर्तनकाराचा वेगळा चेहरा, अध्यात्माचं मार्गदर्शन आणि यासोबतच अनलॉक इन्टरटेन्मेंट करायला, पुन्हा एकदा या संप्रदायाला वेगळं वळण द्यायला मी शिवलीला बाळासाहेब पाटील येत आहे ‘बिग बॉस’च्या घरात,’ असं म्हणत शिवलीला पाटील यांनी ‘बिग बॉस’च्या घरात प्रवेश केला होता.
शिवलीला पाटील या वारकरी संप्रदायातील कीर्तनकार आहेत. सोशल मीडियावर शिवलीला या लोकप्रिय आहेत, पण तरीही ‘बिग बॉस’च्या घरात कीर्तनकार म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण या शो चा फॉरमॅट आता प्रेक्षकांना चांगलाच माहितीये. ‘मात्र स्वतःवर विश्वास असला तर सगळं नीट होतं. माझा स्वभाव आणि माझे विचार या जोरावर मी या घरात राहू शकेन,’ असं म्हणत आपल्या बिग बॉसच्या घरात येण्याचं समर्थनच केलं.
‘कीर्तनकार असताना बिग बॉसच्या घरात जाणं हाच एक मोठा टास्क आहे. कारण बिग बॉसच घर म्हटलं की भांडणं आणि भांडणं म्हणजे अध्यात्माची एकदम विरुद्ध बाजू. भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी, या तुकोबांच्या अभंगाप्रमाणेच एक सुशिक्षित मुलगी सुसंस्कृत असू शकते, कीर्तनकार असू शकते आणि आपली मतं ठामपणे मांडू शकते हे दाखवून देण्यासाठी, लोकांचं मत बदलण्यासाठी मी बिग बॉसच्या घरात येत आहे,’ असं शिवलीला पाटील यांनी घरात प्रवेश करण्याआधी म्हटलं होतं.