मित्रांनो!, शिल्पा शेट्टीसोबत लग्न करण्यापूर्वी राज कुंद्राने त्याची पहिली पत्नी कविताला घटस्फो’ट दिला होता. होय!, कविता कुंद्रा ही सध्या पो’र्नो’ग्रा’फी’क व्हिडिओ प्र’क’र’णात चर्चेत असलेल्या राज कुंद्रा याची पहिली पत्नी आहे. ती एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील आहे.

मूळ भारतातील असलेल्या धनाढ्य ब्रिटीश व्यावसायिक श्री बाल कृष्ण यांची कविता ही मुलगी आहे. कविताचा जन्म 1980 साली लंडनमध्ये झाला कविता यांचे मूळ गाव पंजाबमधील लुधियाना आहे. लंडनमधील स्थानिक शाळेत शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लंडन विद्यापीठातून पदवी पूर्ण केली.

राज आणि कविताने सन 2003 साली लग्नं केले. त्याकाळी राज हिऱ्यांचा व्यापारी होता. लग्नाच्या 3 वर्षानंतरच त्यांच्या वैवाहिक आयुष्यात ख’ट’के उडायला लागले. कविताने अनेक समस्यांचा सामना केला. परंतु अगदीच असह्य झाल्यानंतर 2006 मध्ये राज आणि कविता का’य’दे’शी’र’रित्या वि’भ’क्त झाले. जेव्हा दोघे विभक्त झाले तेव्हा त्यांची मुलगी डेलीना अवघ्या 2 महिन्याची होती.

त्यावेळी कविताने त्यांच्या घटस्फो’टाविषयी शिल्पावर अनेक आ’रो’प लावले होते. राज आणि कविता यांच्या घटस्फो’टा’साठी केवळ आणि केवळ शिल्पाच जबाबदार असल्याचे तिने म्हटले होते. राज आणि शिल्पा यांची एका परफ्यूमच्या प्रमोशनच्या निमित्ताने भेट झाली होती. त्यानंतर ते दोघे बिझनेस पार्टनर बनले.

त्यानंतर शिल्पा आणि राजच्या प्रेमकथेची चर्चा लगेचच मीडियात सुरू झाली होती. त्याच दरम्यान कविताला राजने घटस्फो’टा’ची नो’टि’स दिली होती. त्यावेळी त्यांची मुलगी डेलिना ही केवळ काहीच महिन्यांची होती. राज आणि कविता यांचा घटस्फो’ट झाल्यानंतर काहीच महिन्यात शिल्पा आणि राज यांनी लग्न केले.

तर दुसरीकडे पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार राज कुंद्राने कवितांवरील आरोपांवर उत्तर दिले आहे. तो म्हणाला की, कविता खूप विक्षिप्त आहे. माझी फॅमिली माझ्यासाठी सर्वकाही आहे. मात्र ती माझ्या कुटुंबाला त्रास देत होती. माझे आई-वडील, बहिण आणि तिचा पती आम्ही युरोपमध्ये असताना एकाच घरात राहात होतो.

त्यावेळी तिने माझ्या बहिणीच्या नवऱ्यासोबत खूपच जवळीक वाढवली होती. ती त्याच्यासोबतच जास्त वेळ घालवायची. मला सतत टाळायची. मी तिच्याशी या प्रकरणावर जेव्हा कधी बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. माझ्या ड्रायव्हरने देखील त्या दोघांना अनेकदा एकत्र पाहिले होते.”

सध्या कविता इंग्लंडच्या हॅ’म्पशायर येथे वडिलांचा व्यवसाय सांभाळत आहे. कविताची मुलगी डिलिना कुंद्रासुद्धा तिच्यासोबतच राहते.