मित्रांनो! आत्ताच्या घडीची सगळ्यात ध’क्कादायक बातमी हाती आलीय. भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शिखर धवन आणि त्याची पत्नी आयेशा मुखर्जी यांचा ९ वर्षांनंतर घटस्फो’ट झाला. आयशा मुखर्जीने स्वतः तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर अत्यंत भावनिक पोस्टद्वारे याची पुष्टी केली आहे. २०१२ मध्ये दोघांनी मोठ्या थाटामाटात लग्न केले. वर्ष २०१४ मध्ये त्यांना पुत्ररत्नही प्राप्त झाले होते.

शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी यांची प्रेमकथा खूपच अनोखी आहे. आयेशाचे वडील हे बंगाली आणि आई ब्रिटिश आहे. तिच्या आई-वडीलांची भेटही भारतातच झाली होती. नंतर ते दोघे ऑस्ट्रेलियाला गेले. आयेशाचा जन्म भारतातच झाला. काही दिवसांनी आयेशा ऑस्ट्रेलियाला गेली. तिथच तिचे शिक्षण झाले. अशा प्रकारे तिच्याकडे भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही देशांचे नागरिकत्व आहे. तिचे मेलबर्नमध्ये घर आहे. आयेशा स्वतःही एक खेळाडू असून ती किक बॉक्सिंग खेळते.

शिखर-आयेशा हे दोघेही फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांना भेटले. पहिल्यांदा शिखर धवनने फेसबुकवर आयेशाचा फोटो पाहिला होता. त्यानंतर त्याने आयेशाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. दोघेही फेसबुकवर मित्र झाले आणि प्रकरण इतक्या टोकाला पोहचले की दोघांनीही एकमेकांना आपले हृदय दिले. शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी एकमेकांच्या जवळ येण्यात हरभजन सिंगची मोठी भूमिका आहे कारण शिखर धवनने आयेशाचा फोटो भज्जीच्या फेसबुक अकाऊंटवरच पाहिला होता. त्यानंतर शिखर धवनने आयेशाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. २००९ मध्ये दोघे रिलेशनशिपमध्ये आले. यानंतर शिखर धवनने आयेशाला लग्नासाठी प्रपोज केले व आयेशाने होकार दिला होता.

शिखरच्या घरच्यांना हे लग्नं मान्यच नव्हते, कारण आयशा शिखरापेक्षा १० वर्षांनी मोठी होती. तसेच आयेशा घटस्फो’टित आणि दोन मुलींची आई होती. पण शिखरने त्याच्या कुटुंबाला समजवले. अशा परिस्थितीत २०१२ मध्ये शिखर आणि आयशाचे लग्न झाले. दोन वर्षांनंतर दोघांनाही झोरावर नावाचा मुलगा झाला. लग्नानंतर आयेशाने तिचे आडनाव मुखर्जी बदलून धवन केले. तिचे पहिले लग्न एका ऑस्ट्रेलियन व्यावसायिकाशी झाले होते. या लग्नापासून तिला रिया आणि आलिया नावाच्या दोन मुली होत्या. लग्नानंतर धवनने त्या दोघींना दत्तक घेतले.

या दोन्ही मुली ऑस्ट्रेलियामध्ये शिकतात. लग्नानंतर आयेशा आयपीएल सामन्यांमध्ये टीम इंडियासह शिखरला चीअर करताना अनेकवेळा दिसली होती. लग्नानंतर शिखर धवनने आपल्या आयुष्यातील बदलाचे श्रेय आयेशाला दिले. तो लग्नानंतरच टीम इंडियामध्ये आला आणि नंतर मुख्य खेळाडू बनला. धवनने २०१३ मध्ये कसोटी पदार्पण केले आणि त्यानंतर तो वनडे आणि टी २० मध्ये भारताचा सर्वात मोठा खेळाडू बनला. या यशाचे श्रेय शिखर धवननेही आयेशाला दिले होते.

घटस्फो’टाची बातमी देताना सोशल मीडियावर धवनच्या पत्नीची भावुक पोस्ट व्हायरल झाली आहे. यामध्ये तिने नेमकं काय म्हटलं आहे, पाहा… आयेशाने लिहिले आहे की, ” यापूर्वी माझा एकदा घटस्फो’ट झाला होता. त्यामुळे दुसऱ्यांदा विवाह करताना मी सर्वस्व पणाला लावले होते. मला काही तरी सिद्ध करायचे होते. त्यामुळे दुसऱ्यांदा जेव्हा माझे लग्न मो’ड’ले तेव्हा माझ्यासाठी हा भयावर अनुभव होता.

मला वाटत होतं की, घटस्फो’ट हा एक वाईट शब्द आहे, पण माझा आता दुसऱ्यांदा घटस्फो’ट झाला आहे. पहिल्यांदा जेव्हा माझा घटस्फो’ट झाला होता तेव्हा वाटले होते की, मी स्वार्थी व्यक्ती आहे. कारण मी माझ्या आई-वडिलांना निराश केले होते, त्याचबरोबर मुलांनाही योग्य ती गोष्ट देऊ शकत नाही. त्याचबरोबर मी देवाचाही अपमान केला आहे. पण आता माझ्या आयुष्यात दुसऱ्यांदा घटस्फो’ट झाला आहे.”