एखादी बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी कशी पसरते हे आपण जाणतोच. पण त्या बातमी मागील सत्यता न तपासता जेव्हा अशी बातमी खरी मानतो आणि निष्कर्षापर्यंत पोहोचतो तेव्हा एखाद्याला किती त्रास होऊ शकतो ह्याची आपण केवळ कल्पनाच करू शकतो. असंच काही घडलं आहे अभिनेता शेखर सुमन ह्यांच्या बरोबर.

नुकतीच शेखर सुमन ह्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत एका मीडिया हाऊस विरोधात संताप व नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक, या मीडिया हाऊसने शेखर सुमन ह्यांचा मुलगा अध्ययन ह्याने आत्महत्या केल्याची बनावट बातमी चालवली. ही बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. यामुळे शेखर आणि त्याच्या कुटुंबाला बराच त्रास झाला आहे. शेखर यांनी आपल्या पोस्टमध्ये चॅनेलविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्याविषयी देखील बोलले आहे.

शेखर सुमन यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, “एका मीडिया हाऊस मधील बातमी पाहिली ज्याने आम्हाला सर्वांना उध्वस्त केले. या बातमीने दावा केला आहे की अध्ययन सुमनने आत्महत्या केली आहे. ही बातमी पाहिल्यानंतर आम्ही अध्ययनशी संपर्क साधला. तेव्हा तो दिल्लीमध्ये होता आणि संपर्कक्षेत्राच्या बाहेर येत होता. म्हणूनच त्या एका क्षणी आम्ही सर्व हजारो वेळा मरण पावलो. या धक्कादायक बातमीचा आमच्या सर्वांवर खूप वाईट परिणाम झाला आहे.”

शेखर यांनी पुढच्या पोस्टमध्ये लिहिले की, “मी चॅनेलकडून त्वरित जाहीर माफी मागण्याची मागणी करतो. आयटी मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालय आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनिल देशमुख यांना विनंती करतो की अशा बेजबाबदार आणि द्वेष युक्त कृत्या साठी वाहिनी विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी.”

 

ह्यासोबतच सुमन म्हणाले “आदल्या दिवशी वृत्त वाहिनीने बेजबाबदार कृत्य केले आहे. त्यांनी एक बातमी चालवली ज्याने मला, माझी पत्नी आणि माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना उद्ध्वस्त केले. ही बातमी पाहिल्यानंतर माझ्या पत्नीला धक्का बसला होता. कारण या वृत्त वाहिनीने जाहीर केले होते की अध्ययन सुमनने आत्महत्या केली होती. त्या वेळी अध्ययन घरी ही नव्हता, तो दिल्लीत होता.”

शेखर यांनी पुढे लिहिले की, “मी अशा घृणास्पद कृत्याबद्दल चॅनेलविरूद्ध कायदेशीर कारवाई करीत आहे. मीडियाने अधिक जबाबदार असले पाहिजेत ना की स्वत: च्या स्वार्थासाठी लोकांचे जीवन असे उध्वस्त केले पाहिजे . मी सर्व लोकांना प्रार्थना करतो की सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन चॅनेलवर बंदी घालण्याची मागणी करावी.”

त्यासोबतच शेखर म्हणाले, “आम्ही घाबरलो आहोत आणि अजूनही धक्क्यातून बाहेर पडलो नाही. चॅनलच्या अशा अयोग्य वर्तना विरोधात मी सर्व लोकांना सोशल मीडियावर पोस्ट करण्याची विनंती करतो आणि चॅनेलवर बंदी घालावी अशी मागणी करतो. त्यामुळे इतर कोणासोबत पुन्हा तसे होऊ नये.”