वेगवेगळ्या विषयांवर सध्या मालिका येण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. म्हणजे लॉ’क डा’उ’न नंतर जसं शूटिंग ला प’र’वा’न’गी मिळाली तशी एकेक मालिका आपल्या समोर येत आहे. त्यात याआधी मालिकेत गा’ज’ले’ले कलाकार ही असतातच.

एक प्रसिद्ध अभिनेता आहे जो श्री म्हणून ही खूप फेमस आहे. त्याचे लाखो चाहते आहेत. तर आता आपल्याला कळलं असेल तो कोण ? शशांक केतकर.

होय नव्या मालिकेत तो आपल्याला भेटायला येत आहे. पण ती मालिका कोण ? आणि अजून कोण कोण काम करतय. कोणत्या चॅनेल्स ला येतेय ? तर चला मग हेच सविस्तर रित्या आपण जाणून घेणार आहोत.

झी मराठीवरील होणार सून मी ह्या घरची या मालिकेतील श्रीच्या भूमिकेतून शशांक केतकर घराघरात पोहचला. या मालिकेला आज इतकी वर्षं झाली असली तरी प्रेक्षकांना त्याची ही भूमिका चांगलीच लक्षात आहे. या मालिकेत तेजश्री प्रधानसोबत त्याची जोडी जमली होती.

या मालिकेनंतर त्याने सुखांच्या सरींनी हे मन बावरे,  इथेच टाका तं’बू, नकटीच्या लग्नाला यायचं यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले. मालिकेशिवाय तो 31 दिवस, आरॉन, वन वे तिकीट यांसारख्या चित्रपटात झ’ळ’क’ला. तसेच पूर्णविराम आणि गोष्ट तशी गंमतीची या नाटकातही त्याने काम केले आहे.

शशांकने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले असले तरी त्याला खऱ्या अर्थाने ओळख होणार सून मी ह्या घरची या मालिकेमुळेच मिळाली. या मालिकेमुळे तरुणीच्या ग’ळ्या’त ता’ई’त बनलेला शशांक आता झी मराठीवरील एका मालिकेत पुन्हा एकदा दिसणार आहे.

‘पाहिले न मी तुला’ ही मालिका लवकरच झी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. या मालिकेत शशांक एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसार आहे. या मालिकेत त्याची भूमिका काय असणार याविषयी वाहिनीने आणि मालिकेच्या टीमने मौन राखणेच पसंत केले आहे. त्याची भूमिका काय असणार हे प्रेक्षकांसाठी सरप्राईज असणार आहे.

शशांकसोबतच या मालिकेत आशय कुलकर्णी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आशयने माझा होशील ना या मालिकेत डॉ. सुयशची भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. तसेच या मालिकेत तन्वी मुंडले हा नवीन चेहरा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

या मालिकेत शशांक आहे म्हंटल्यावर चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. काही नवीन चेहरे ही यात काम करत आहेत. तर त्यांचे ही अभिमान वाटावा असं अभिनंदन. शशांक केतकर या तरुण अभिनेत्यास त्याच्या नवनवीन कामाला स्टार मराठी कडून खूप खूप शुभेच्छा.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नावसहित वेबसाइट वर पब्लिश करू.