माणसं उगीच मोठे होत नाहीत !!

त्यांनी शेंदुर फासून अनेक दगडांना देव केलं पण भक्तांच्या अन अंधभक्तांच्या रांगा पाहुन ऐनवेळी त्या दगडांनी मंदीर बदललं.

त्यावेळी मनावर दगड ठेऊन मनात झालेल्या जखमा जखमी पायाला न सांगता 79 व्या वर्षी डगमगणारे पाय चालत राहिले महाराष्ट्रभर ऊन-वारा अन पावसात.

अन त्याच वेळी त्यांनी पायाच्या जखमा ही मनाला कळू दिल्या नाही.

कदाचित कोणाला काही कळु द्यायचं नाही हा स्वभाव गुण त्यांनी स्वतःच्या शरीराला ही लागु केला असेल.

एकीकडे ईडीच्या भितीने अन सत्तेच्या लालसेने सर्वांनी माना टाकलेल्या असताना शरद पवार एकटे भिडतायेत ही गोष्ट लोकशाही साठी प्रचंड आशावादी आहे.

शिवाय नकळतपणे “कष्टाला पर्याय नाही” हा अत्यंत प्रेरणादायी संदेश त्यांनी पार्थ सह सगळ्या महाराष्ट्राला, तरुणांना, कार्यकर्त्यांना दिला आहे.
शरद पवार भन्नाट माणुस आहेत राव !!

एकीकडे काँगेस जिवंत आहे की नाही इथपर्यंत शंका येत असताना पवार साहेब मात्र विरोधी पक्षाची धुरा सक्षमपणे पेलताना दिसत आहेत.

काही लोकं म्हणतात ते खोटं नाही.
“शरद पवारांवर टिका करणं सोप्पं आहे पण शरद पवार होणं अवघड आहे”.

– चांगदेव गिते, बीड
9665875815
टिप- मी राष्ट्रवादी चा कार्यकर्ता नाही.